Saturday, April 27, 2024
Homeनगरपुढील आठवड्यात उपसरपंचाच्या निवडी

पुढील आठवड्यात उपसरपंचाच्या निवडी

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

जिल्ह्यात मुदत संपलेल्या 203 ग्रामपंचायतींचा निवडणूक कार्यक्रम नुकताच पार पडला. यात 15 सरपंच आधीच बिनविरोध निवडून आलेले होते. तर, 188 सरपंचपदासाठी निवडणूक झालेली. आता निवडून आलेल्या या सरपंच यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामपंचायत सभा होऊन निवडून आलेल्या सदस्यांतून उपसरपंच पदाची निवडणूक होणार आहे. दरम्यान, याबाबतचा प्रोग्राम जिल्हा प्रशासन तयार करून संबंधीत ग्रामपंचायतींना पाठवणार आहेत. पुढील आठवड्यात उपसरपंच पदाच्या निवडी शक्य होणार असल्याचे जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले.

- Advertisement -

जिल्ह्यातील मुदत संपलेल्या 203 ग्रामपंचायतीचा निवडणूक कार्यक्रम पारपडलेला आहे. यात 188 सरपंच पदासाठी निवडणूक झाली असून 15 सरपंच आधीच अविरोध निवडून आलेले होते. निवडून आलेल्या सरपंचाची यादी आज (शुक्रवारी) राजपत्रात प्रसिध्द करण्यात येणार आहे.

तसेच उपसरपंच या निवडीसाठी निवडून कार्यक्रम तयार करण्यात येणार या निवडणूक कार्यक्रमानूसार सरपंच यांच्या अध्यक्षतेखाली विशेष सभा होणार आहे. या सभेच्या अध्यक्षस्थानी सरपंच राहणार असून त्यात उपसरपंच पदासाठी निवडणूक घेण्यात येणार आहे. पुढील आठवड्यात ही प्रक्रिया पूर्ण होणार असल्याचे जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले.

- Advertisment -

ताज्या बातम्या