Thursday, April 25, 2024
Homeनगरनेवासा शहरातील तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

नेवासा शहरातील तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

नेवासा |तालुका वार्ताहर| Newasa

नेवासा येथील गंगानगर भागातील रहिवासी सुनील जगन्नाथ धनवटे (वय 34) याने घराच्या छताला असलेल्या अँगलला नायलॉनची दोरी बांधून गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी दुपारच्या सुमारास घडली.

- Advertisement -

याबाबत मयताचा चुलतभाऊ बाळासाहेब बबन धनवटे (वय 43) यांनी नेवासा पोलीस ठाण्यात खबर दिली. सदर इसमाचा मृतदेह नेवासा फाटा येथील ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी नेण्यात आला. पुढील तपास हवालदार तुळशीराम गिते हे करत आहेत. सुनील धनवटे याच्या पश्चात आई, वडील, पत्नी, मुलगा, मुलगी, भाऊ असा परिवार आहे. आत्महत्येचे कारण समजू शकलेले नाही.

- Advertisment -

ताज्या बातम्या