Thursday, April 25, 2024
Homeक्रीडान्यूझीलंडच्या विजयाने भारताचे आव्हान संपुष्टात

न्यूझीलंडच्या विजयाने भारताचे आव्हान संपुष्टात

कर्णधार विराट कोहलीचे टी-२० वर्ल्डकपचे विजेतेपद मिळवण्याचे स्वप्न अखेर भंगले. आज न्यूझीलंडने अफगाणिस्तानचा ८ विकेटनी पराभव केला आणि भारताचे आयसीसी टी-२० वर्ल्डकप २०२१ मधील आव्हान संपुष्टात आले. आता भारताची उद्याची नामिबियाविरुद्धची लढत फक्त औपचारिकता असणार आहे.

ड्रग्ज प्रकरणातील धुळ्याचा सुनील पाटील अन् मोहीत कंबोज

- Advertisement -

न्यूझीलंडविरुद्ध अफगाणिस्तानने टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. अफगाणिस्तानने २० षटकात ८ बाद १२४ धावा केल्या. नजीबुल्लाने ३३ चेंडूत अर्धशतक केले. त्याने ४८ चेंडूत ७३ धावा केल्या. यात ६ चौकार आणि ३ षटकारांचा समावेश होता. न्यूझीलंडने हे लक्ष्य १८.१ षटकातच पुर्ण केले आणि भारताचे उपांत्यफेरीत संपण्याचा स्वप्न भंगले.

भारतीय संघाचा उद्या नामिबिया विरोधात एक सामना होणार आहे. पण नामिबिया विरुद्धच्या लढतीत भारताला विजय प्राप्त करुन ६ गुणांसह तिसऱ्या स्थानावर समाधान मानावं लागणार आहे. पाकिस्तान आणि न्यूझीलंड प्रत्येकी ८ गुणांसह अनुक्रमे पहिल्या व दुसऱ्या स्थानावर आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या