Friday, April 26, 2024
Homeदेश विदेशनेपाळमधील बेपत्ता विमान सापडलं, ४ भारतीयांसह २२ प्रवाशांचा होता समावेश

नेपाळमधील बेपत्ता विमान सापडलं, ४ भारतीयांसह २२ प्रवाशांचा होता समावेश

दिल्ली | Delhi

नेपाळमध्ये (Nepal) २२ जणांना नेणाऱ्या एका विमानाचा संपर्क अचानक तुटला होता. या विमानात एकूण २२ प्रवाशी होते. ‘तारा एअर’ कंपनीचे (Tara Air flight missing हे विमान होते.

- Advertisement -

दरम्यान सकाळपासून बेपत्ता असलेले हे विमान तब्बल सहा तासांहून अधिक काळानंतर सायंकाळी साडेचार वाजण्याच्या सुमारास मस्टँग परिसरात सापडले आहे. मात्र, विमानातील प्रवासी सुरक्षित आहेत की, नाही हे अद्याप समजू शकलेले नाही.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, लष्कराच्या अधिकाऱ्यांना दूरवरून धूर निघताना दिसला. त्यानंतर विमानाचा शोध घेण्यात आला. खराब हवामानामुळे अनुचित प्रकार घडण्याची भीती असल्याने लष्कराला बचावकार्य कठीण जात आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या