Sunday, May 5, 2024
Homeमुख्य बातम्या'नीट' परीक्षेची तारीख जाहीर; आजपासून नोंदणी प्रक्रिया

‘नीट’ परीक्षेची तारीख जाहीर; आजपासून नोंदणी प्रक्रिया

नवी दिल्ली। वृत्तसंस्था

नीट परीक्षेच्या (NEET Exam ) तारखांची अधिकृत घोषणा अखेर करण्यात आली आहे. नवनिर्वाचित केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी ट्विटरच्या माध्यमातून नीट परीक्षांच्या तारखांची घोषणा केली आहे. नीट (यूजी) 2021 परीक्षा 12 सप्टेंबर 2021 रोजी होणार आहे. परीक्षेचे आयोजन करोना संदर्भातील नियमांचे पालन करुनच केले जाणार आहे. या परीक्षेसाठी वेबसाइट्सवर नोंदणी प्रक्रियेला सुरुवात होणार आहे.

- Advertisement -

करोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता परीक्षा केंद्रांवर आवश्यक सर्व सुविधा उपलब्ध करुन दिल्या जाणार आहेत. यात विद्यार्थ्यांना मास्क आणि सॅनिटायझर उपलब्ध करुन देण्यापासूनची व्यवस्था करण्यात येणार आहे. याशिवाय विद्यार्थ्यांच्या परीक्षा केंद्रावर उपस्थित राहण्याची आणि परीक्षा केंद्रातून बाहेर पडण्यासाठीची वेळ देखील निश्चित केली जाणार आहे. कोणत्याही व्यक्तीच्या संपर्काविना नोंदणी, सॅनिटायझेशन, सोशल डिस्टन्सिंगच्या नियमानुसार बैठक व्यवस्था अशा सर्व नियमांचें पालन केले जाणार आहे.

देशभरातून लाखो विद्यार्थी नीट 2021 परीक्षेच्या तारखांची वाट पाहात होते. करोना व्हायरसच्या दुसर्‍या लाटेमुळे परीक्षा स्थगित करण्याचा निर्णय घ्यावा लागला होता. त्यानंतर गेल्या अनेक दिवसांपासून नीट परीक्षेबाबत सविस्तर माहिती देण्याची मागणी विद्यार्थ्यांनी लावून धरली होती. त्यानंतर ऑगस्ट महिन्यात परीक्षा होईल अशी शक्यता वर्तविण्यात येत होती. त्यानंतर आता सप्टेंबर महिन्याच्या 12 तारखेला परीक्षा होणार असल्याचे अधिकृतरित्या जाहीर करण्यात आले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या