Thursday, April 25, 2024
Homeमुख्य बातम्याजाहिरातीवरून राजकारण तापलं : “इजा 'कानाला' झालेली नव्हती तर...”; रोहित पवारांनी पुन्हा...

जाहिरातीवरून राजकारण तापलं : “इजा ‘कानाला’ झालेली नव्हती तर…”; रोहित पवारांनी पुन्हा डिवचलं

मुंबई | Mumbai

गेल्या दोन दिवसांपासून महाराष्ट्रात एका जाहिरातीमुळे राजकीय तर्क-वितर्कांना उधाण आलं आहे. एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रीपदासाठी देवेंद्र फडणवीसांपेक्षा जास्त लोकांची पसंती असल्याचं एका सर्व्हेमधून समोर आल्याचा दावा करणारी जाहिरात प्रकाशित झाली होती. अनेक वर्तमानपत्रांमध्ये ही जाहिरात आल्यानंतर त्यावरून राजकीय दावे-प्रतिदावे सुरू झाले. या जाहिरातीशी शिंदे गटाचा काहीही संबंध नसल्याचं स्पष्टीकरण शंभूराज देसाई यांनी दिलं आहे. मात्र, दोन्ही सत्ताधारी पक्षांमध्ये सारंकाही आलबेल नसल्याचा तर्क यावरून मांडला जात आहे.

- Advertisement -

मंगळवारी ही जाहिरात प्रकाशित झाल्यानंतर राजकीय वर्तुळात खळबळ उडाली. यानंतर आज शिंदे गटाकडून डॅमेज कंट्रोल जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. यामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचाही फोटो आहे. याशिवाय शिंदे गटातील सर्व मंत्र्यांचेही फोटो यात आहेत. त्याचबरोबर सर्वात वर एकीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांचे फोटो असून दुसरीकडे बाळासाहेब ठाकरे व आनंद दिघे यांचे फोटो आहेत.

आळंदीत नेमकं काय घडलं? आणखी एक VIDEO आला समोर

यावरून महाविकास आघाडीचे नेते भाजप-शिवसेना शिंदे गटावर खोचक टीका करत आहेत. जाहिरात प्रकरणावर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि आमदार रोहित पवार यांनी प्रतिक्रिया देताना सरकारवर निशाणा साधला. रोहित पवार यांनी दोन्ही जाहिरातींची फोटो ट्विटरवर शेअर केला आहे. यामध्ये रोहित पवारांनी सरकारवर टीकास्त्र सोडले.

रोहित पवार यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हंटल आहे कि, “इजा ‘कानाला’ झालेली नव्हती तर ‘मनाला’ झालेली होती आणि मनाला झालेली इजा परवडणार नसल्यानेच आज पुन्हा नवीन जाहिरात दिली असावी. असो! सरकारने कामं केली असती तर जाहिरातीतून असे ढोल वाजवण्याची वेळच आली नसती. त्यातही जाहिरातीच्या मांडणीवरूनच इतका गोंधळ असेल तर सरकार चालवताना किती असेल? यामुळंच राज्यात गोंधळाचं वातावरण निर्माण झालंय… यांच्या काही नेत्यांना पदं मिळाली पण सामान्य नागरिक मात्र अडचणीत आलाय.. सरकार केवळ जाहिरातीतच दिसत असल्याने बेरोजगारांनी नोकरी आणि भाकरीऐवजी यांच्या जाहिरातीच पाहत बसायचं का?”

वारकऱ्यांवरील लाठीमारावरून जयंत पाटील, राऊतांचा संताप; रोहित पवारांनीही सुनावलं

- Advertisment -

ताज्या बातम्या