Wednesday, April 24, 2024
Homeमुख्य बातम्याराजकारणात वेगवान घडामोडी! अजितदादांचे दिवसभरातील सर्व कार्यक्रम रद्द, बावनकुळे तडकाफडकी दिल्लीला

राजकारणात वेगवान घडामोडी! अजितदादांचे दिवसभरातील सर्व कार्यक्रम रद्द, बावनकुळे तडकाफडकी दिल्लीला

मुंबई | Mumbai

राजकीय वर्तुळात गेल्या काही दिवसांपासून मोठ्या घडामोडी घडताना दिसून येत आहेत. राज्यात सध्या पक्ष बदलाचे वारे आणि चर्चा मोठ्या प्रमाणावर दिसून येऊ लागले आहेत.

- Advertisement -

त्यातच आज अजित पवार यांचे पुण्यातील आजचे कार्यक्रम अचानक रद्द करण्यात आले आहेत. त्यामुळे अजित पवार भाजपमध्ये जाणार का? अजित पवारांच्या मनात नेमके शिजतेय तरी काय?, या चर्चांना पुन्हा उधाण आले आहे.

मुलाचा एन्काउंटर, बापाची खुलेआम हत्या! ४४ वर्षात उभारलेले अतिक अहमदचे साम्राज्य ५१ दिवसांत उद्धवस्त

एकीकडे अजित पवार यांचे कार्यक्रम अचानक रद्द झाले आहेत. तर दुसरीकडे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आज तडकाफडकी दिल्लीला गेले आहेत. बावनकुळेंचा अचानक दिल्ली दौरा आणि दुसरीकडे अजित पवार यांनी सासवडमधील सर्व कार्यक्रम स्थगित केल्यानं चर्चेला उधाण आलं आहे.

Atiq Ahmed : उत्तर प्रदेशमध्ये हाय अलर्ट जारी, गँगस्टर अतिक अहमद अन् त्याच्या भावावर गोळी झाडणारे ते हल्लेखोर कोण?

दरम्यान भाजपने शिवसेना जशी फोडली तसाच प्रकार राष्ट्रवादी काँग्रेससोबत सुरु आहे. पक्ष सोडण्यासाठी आमदारांवर दबाव आणला जातोय, असं वक्तव्य संजय राऊत यांनी केलंय. राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांवर दबाव आहे. या दबावामुळे ज्यांना पक्ष सोडायचा आहे, त्यांनी निर्णय घ्यावा, असं शरद पवार यांनी भेटीत सांगितल्याचा गौप्यस्फोटही संजय राऊत यांनी केलाय.

- Advertisment -

ताज्या बातम्या