Wednesday, May 8, 2024
Homeदेश विदेशनक्षलवाद्यांचा सुरक्षा रक्षकांवर हल्ला; २२ जवान शहीद

नक्षलवाद्यांचा सुरक्षा रक्षकांवर हल्ला; २२ जवान शहीद

दिल्ली | Delhi

छत्तीसगडच्या सुकमा-बिजापूर सीमावर्ती भागात शनिवारी सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक झाली.

- Advertisement -

नक्षल्यांनी केलेल्या घातपाती हल्ल्यात ५ जवान शहीद झाले होते. तर १४ जवान बेपत्ता झाले होते. बेपत्ता जवानांच्या शोधासाठी रविवारी सकाळी मोहीम हाती घेण्यात आली. बेपत्ता असलेल्या १४ जवानांचे मृतदेह जंगलात सापडले असून, मोठी खळबळ उडाली आहे.

या चकमकीत केवळ जवान शहीद झाले नाहीत. तर नक्षलवाद्यांना ठार करण्यातही यश आलं असल्याचं म्हटलं जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या चकमकीवेळी घटनास्थळी २०० हून अधिक नक्षलवादी उपस्थित होते.

या दुर्घटनेवर अमित शाह यांनी मोठी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, की मी छत्तीसगडमध्ये माओवाद्यांसोबतच्या लढ्यात वीरमरण आलेल्या शूर जवानांना नमन करतो. देश त्यांचं हे योगदान कधीच विसरणार नाही. मी त्यांच्या कुटुंबीयांसाठी सहानुभूती व्यक्त करतो. आपण शांती आणि प्रगतीविरोधातील या शत्रुंसोबतची लढाई सुरूच ठेवू. जखमींच्या चांगल्या आरोग्यासाठी प्रार्थना करतो, असंही ते म्हणाले.

शुक्रवारी रात्री नक्षलविरोधी कारवाईत केंद्रीय राखीव पोलिस दलाच्या कोब्रा बटालियन, बिजापूर आणि सुकमा जिल्ह्यातील डीआरजी आणि एसटीएफची संयुक्त टीम रवानगी केली गेली. बिजापूर जिल्ह्यातील तर्रेम, उसूर आणि पामेड आणि सुकमा जिल्ह्यातील मिनपा व नरसापुरम येथून सुमारे दोन हजार सैनिक नक्षलविरोधी कारवाईत सहभागी होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या