Friday, April 26, 2024
Homeनंदुरबाररायंगण येथे 3 लाखाचे सागवानी लाकूड जप्त

रायंगण येथे 3 लाखाचे सागवानी लाकूड जप्त

नवापूर – Navapur – श.प्र :

तालुक्यातील रायंगण येथील एका घरात 3 लाख रुपये किमतीचे सागवानी तसेच इतर जातीचे लाकूड वनविभागाने जप्त केले आहे.

- Advertisement -

येथील वनक्षेत्रपालांना मिळालेल्या गुप्त बातमीनुसार शासकीय वाहनाने रायंगण (फुलफळी) येथील संशयित आरोपी रणजीत झालु गावीत याच्या घराची झडती घेतली असता सदर घरात ताज्या तोडीचे साग साईज, सिसम साईज, शिवन साईज प्रजातीचे एकुण 49 नग कटसाईज नग घडतळ केलेला लाकूड माल अवैधरित्या साठवणूक केलेला ठिकठिकाणी आढळून आला.

त्यासोबत एक रंधा मशिन 1, बॉक्स दिवान1 असा सदर मुद्देमाल जप्त करून शासकीय वाहनाने व खाजगी वाहनाने भराई करून शासकीय विक्री आगार नवापूर येथे पावतीने जमा केला. सदर मुद्देमालाची अंदाजे किंमत 3 लाख रूपये आहे.

सदर कार्यवाहीत वनक्षेत्रपाल नवापूर प्रथमेश हाडपे, डी.के.जाधव, वनपाल वडकळंबी, वनरक्षक सतीश पदमर, कल्पेश अहिरे, कमलेश वसावे, संतोष गायकवाड, नितीन पाटील, अनिल वळवी, संजय बडगुजर, दीपक पाटील यांनी केली आहे.

सदर गुन्ह्याबाबत नवापूर वनक्षेत्रपाल प्रथमेश हाडपे यांनी संबंधित आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला असून पुढील कार्यवाही उपवनसंरक्षक शहादा, उपविभागीय वनअधिकारी दक्षता पथक धुळे, सहाय्यक वनसंरक्षक नंदुरबार, वनक्षेत्रपाल नवापूर यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील कार्यवाही सुरू आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या