नाशिककरांची दिवाळी खरेदी पाण्यात

नाशिक । प्रतिनिधी | Nashik

दोन दिवसांपासून उघडीप दिलेल्या पावसाने (rain) आज सायंकाळी तीन ते चार वाजेच्या सुमारास पावसाने जोरदार हजेरी लावत दिवाळी (diwali) खरेदीसाठी बाहेर पडलेल्या नाशिककरांना (nashikkar) झोडपून काढले.

यावेळी बाजारात गर्दी असल्याने अचानक आलेल्या परतीच्या पावसाने (rain) नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली. यावेळी बाजारपेठेत आलेल्या आकाशकंदील (lantern), पणत्या बाजारावर पावसाने पाणी फेरले.

जिल्ह्यात आजपासून पुढील 3,17,18,19 (सोमवार ते बुधवार) जोरदार पावसाची (heavy rain) शक्यता वर्तविल्यानंतर आज त्याची झलक पावसाने दाखवली. नाशिक (nashik), इगतपुरी (igatpuri), सिन्नर (sinnar), वणी (Vani) परीसरात दुपारी विजांंच्या कडकडाटासह जोरदार पाऊस (Heavy rain with lightning) झाला.

सिन्नर तालुक्यात (sinnar taluka) वीज पडून सहा शेळ्या ठार झाल्या तर एका घरावर वीज पडून घराचे मोठेे नुकसान झाले. नाशिकमध्ये दिवाळीसाठी (diwali) वस्तु विक्रीसाठी आलेल्या विके्रत्यांच्या दुकानात पाणी शिरल्याने त्यांना मोठी झळ लागली. या परतीच्या पावसामुळे शेतीच्या नुकसानीची (crop damage) आणखीनच भर पडली आहे.

गुरुवार दि.20 सप्टेंबरपासून पावसाचा जोर काहीसा कमी होण्याची शक्यता असली तरी मध्यम ते मुसळधार पावसाची (heavy rain) शक्यता ही कायम आहे. सध्या परतीच्या पावसाच्या वेगवान गतीविधीतेसाठी वातावरण अतिशय अनुकूल असून येत्या 3 दिवसात विविध वातावरणीय प्रणालीतून महाराष्ट्रातून (maharashtra) मान्सून (monsoon) परत फिरण्याचा हा उच्चतम जाणवतो आहे.

खरीप पिके (kharif crop) काढणी, रब्बी पिके (rabbi crop) रोवणी, कांदा रोपे टाकणी, द्राक्षबाग छाटणी (Pruning the vineyard) तसेच पोंगा सुरक्षिततेसाठीची आवश्यक उघडीप ह्यासाठी सध्या पावसाचा अडथळा जाणवत असला तरी शेतकर्‍यांनी घाबरून जाऊ नये.

गुरुवार दि. 20 पासुन हळूहळू वातावरणात सुधारणेची अपेक्षा हवामान तज्ञ माणिकराव खुळे यांनी व्यक्त केली आहे. आज दुपारी अडीचच्या सुमारास नाशिकमध्ये पाऊस झाला. तत्पूर्वी दिवसभर ढगाळ वातावरण होेते. पावसामुळे हवेत गारवा निर्माण झाला. सायंकाळी तापमान घसरल्याने थंडी सदृष्य वातावरण होते.

आजच्या पावसाने ओेंढेवाडी(ता.सिन्नर) येथे भगवान खेताडे यांच्या सहा शेळ्या वीज पडून ठाऱ झाल्या. तसेच खोपडी खुर्द येथे सुरेश दराडे यांच्या घरावर वीज पडल्याने पत्रे जळाले. घराचे मोठे नुकसान झाले. वणी विजा पडण्याच्या घटना घडल्या.नाशिकमध्ये मेनरोड,शालीमार परीसरात दिवाळी सणासाठी वस्तु विक्रीस आलेल्या विके्रत्यांच्यां मालाचे नुकसान झाले. अजुन दोन दिवस पावसाचा सामना करावा लागणार आहे.