Friday, April 26, 2024
Homeनाशिकवरूणराजाची पुण्याई; जिल्ह्यातील धरणसाठा 'इतक्या' टक्क्यांवर

वरूणराजाची पुण्याई; जिल्ह्यातील धरणसाठा ‘इतक्या’ टक्क्यांवर

नाशिक | प्रतिनिधी Nashik

नाशिक जिल्ह्यात (Nashik District) वरुणराजाने संपूर्ण हंगामभर पाठ फिरवली होती. मात्र, सप्टेंबर महिन्यात वरूणराजाच्या पुण्याईने धरणसाठा (Water storage) ८१ टक्क्यांवर पोहोचला आहे. तब्बल २४ प्रकल्पातील सात प्रकल्पात १०० टक्के जलसाठा आहे. तर ११ प्रकल्पात ९० पेक्षा अधिक पाण्याची साठवण झाली आहे. तर आठ प्रकल्पातून विसर्ग होण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे नाशिक जिल्ह्याची यंदाची पाणीटंचाई (Water scarcity) संपली असल्याचे चित्र सध्यातरी दिसून येत आहे.

- Advertisement -

जिल्ह्यातील अनेक धरणे ओव्हरफ्लो (overflow) झाल्याने सांडव्यावरून पाणी नदीपात्रात पडत आहे. दुसरीकडे काही धरणाच्या पाणलोट क्षेत्रात संततधार सुरु असल्यामुळे येथील प्रकल्पातील पाणी टप्प्याटप्प्याने सोडण्याच्या हालचाली जलसंपदा विभागाने सुरु केल्यामुळे सद्यस्थितीत याठिकाणी पाण्याचा विसर्ग केला जात आहे.

जिल्ह्यातील गंगापूर धरणसमूहात (Gangapur Dam) ९५ टक्के जलसाठा झाला आहे. यामध्ये आळंदी १०० टक्के भरले आहे तर गंगापूरमध्ये ९८ टक्के जलसाठा आहे. कश्यपीत (kashyapi dam) ८५ तर गौतमी गोदावरीत ९७ टक्के जलसाठा आहे. पालखेड धरण (palkhed dam) ९६ टक्के, करंजवण ६१ टक्के, वाघाड १०० टक्के, ओझरखेड ४५, पुणेगाव ९४ टक्के, तिसगाव २९ टक्के जलसाठा आहे.

दारणात ९९ टक्के जलसाठा आहे तर भावली धरणात १०० टक्के जलसाठा आहे. दुसरीकडे वालदेवीदेखील १०० टक्के भरले असून मुकणे धरणात ७२ टक्के जलसाठा आहे. कडवामध्ये ९९ टक्के जलसाठा आहे तर नांदूरमध्यमेश्वरमध्ये (Nandurmadhyameshwar Dam) ९१ टक्के जलसाठा आहे.

भोजापूरमध्ये ५२ टक्के, चणकापूर ९६ टक्के, हरणबारी १०० टक्के, केळझर १०० टक्के जलसाठा आहे. नागसाक्या १०० टक्के भरले आहे. तर उत्तर महाराष्ट्राला पाणीपुरवठा करणारे गिरणा ६७ टक्के भरल्याने मोठा दिलासा जळगाववासियांना मिळाला आहे. पुनद ९७ टक्के भरले आहे तर माणिकपुंज धरण १०० टक्के भरल्यामुळे मनमाड नांदगाव वासियांना दिलासा मिळाला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या