जीवनावश्यक वस्तूंवर जीएसटी; नाशिकरोडला कडकडीत बंद

नाशिकरोड | प्रतिनिधी Nashikroad

जीएसटी कौन्सिलकडून ब्रँडेड जीवनाशक वस्तूवर पाच टक्के जीएसटी आकारण्याचा जो निर्णय घेतला आहे. त्याचा येथील व्यापारी संघटनेने निषेध करून कडकडीत बंद पाळला या बंदला नाशिकरोड परिसरातील व्यापाऱ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला….(Bharat Bandh, due to GST Issue)

काही जीवनावश्यक वस्तूंवर जीएसटी लागू होणार असल्याने त्याचे परिणाम सर्वसामान्य नागरिकांना सहन करावा लागणार आहे. गहू, पोहे, गुळ, दही, मध, टेट्रा पॅक, एलईडी बल्ब यासारख्या जीवनाशक वस्तूवर पाच ते सहा टक्के अतिरिक्त जीएसटी 18 जुलैपासून लागू होणार आहे.

अगोदरच महागाईने हैराण झालेल्या नागरिकांना जीएसटीच्या वाढीमुळे खिशाला आर्थिक फटका बसणार आहे. केंद्र सरकारने जीएसटी लागू करण्यापूर्वी अन्नधान्यावर जीएसटी लागू करणार नाही, अशी ग्वाही दिली होती.

मात्र, काही वर्षांपूर्वीच ब्रॅण्डेड धान्यावर जीएसटी (GST) लागू केला होता त्यानंतर नुकत्याच झालेल्या जीएसटी कौन्सिलच्या (GST Council) बैठकीत नॉन ब्रांडेड धान्यावरही जीएसटी लागू करण्याचा निर्णय घेण्यात आल्याने या निर्णयाविरोधात देशभरातील व्यापाऱ्यांनी संताप व्यक्त केला असून त्याला सर्व व्यापाऱ्यांनी कडकडून विरोध केला आहे.

या लागू करण्यात आलेल्या पाच टक्के जीएसटीमुळे सर्वसामान्य नागरिकांच्या खिशाला मोठी आर्थिक झळ बसणार आहे. केंद्र शासनाच्या या निर्णयाच्या निषेधार्थ आज नाशिकरोड परिसरातील होलसेल व किरकोळ व्यापाऱ्यांनी बंद पाळला.

नाशिक रोड परिसरातील (Nashikroad Area) सुभाष रोड जवाहर मार्केट (Subhash road javahar market) बिटको चौक (Bitco chauk area) परिसर देवळाली गाव (Deolali Gaon) जेलरोड छत्रपती शिवाजी महाराज पुतळा चौक परिसर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रोड शाहू पथ या भागातील सर्व व्यापाऱ्यांनी बंद पाळला.

हा बंद यशस्वी करण्यासाठी राजन बच्चू मल, नेमीचंद कोचर,(Nemichand Kochar) जगदीश आडके (Jagdish Adake) सुंदरदास गोपालदास (Sundardas Gopaldas) सुनील चांदवडकर, अमलोक भंडारी, दशरथ मालपाणी, संतोष डेरले आदींनी विशेष परिश्रम घेतले.


Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *