Wednesday, May 8, 2024
Homeनाशिकनाशिक पश्चिम विभाग रुग्णालयाच्या प्रतीक्षेत

नाशिक पश्चिम विभाग रुग्णालयाच्या प्रतीक्षेत

नाशिक । नरेंद्र जोशी Nashik

विविध आजारांचे लसीकरण तेही फिरत्या दवाखान्याद्वारे, ‘ओपीडी’सारखी सेवा कॉलेजरोड, गंंगापूररोड भागात पश्चिम विभागीय कार्यालयातर्फे दिली जाते. गंभीर आजारांवर उपचार करू शकत नाही, आजार होऊ नये म्हणून उपक्रम राबवते, पण गंभीर आजार झाल्यावर फक्त चांगल्या मोठ्या डॉक्टरांकडे जाण्याचा सल्ला देऊ शकते.

- Advertisement -

महापालिकेचे सर्व सुविधांयुक्त सुसज्ज रुग्णालय हा विषय महापालिका महासभेच्या अजेंड्यावर येण्याची वाट पाहत आहे. वैद्यकीय क्षेत्रात रोज नवनवीन प्रयोग होत आहेत. विविध प्रकारच्या व्याधींवर संशोधनाद्वारे विविध चिकित्सापद्धती अस्तित्वात येत आहेत. नाशिक शहरातील खासगी वैद्यकीय क्षेत्राने नेत्रदीपक प्रगती केली आहे. नवीन बदलांना सामावून घेत आहे. त्या तुलऩेने महापालिकेच्या आरोग्य केंद्रांतून रुग्णांना औषधोपचार केले जातात. वरवर मलमपट्टी निश्चित होते. मात्र नावीन्याची कास धरताना दिसत नाही.

नाशिकमधील पश्चिम विभाग हा उच्चभ्रू वर्गाचा समजला जातो. येथे उच्च मध्यमवर्गीय क्वचितच महापालिकेच्या रुग्णालयाची पायरी चढतात. मात्र कबीरनगर, मल्हार खाण, मिलिंदनगर, कालिका झोपडपट्टी, सहजीवननगर, शरणपूररोड येथील झोपडपट्टीवासीयांंना मात्र मोठ्या खासगी हॉस्पिटलची पायरी चढण्याचे धाडस होत नाही. त्यामुळे त्यांना महापालिकेच्या रुग्णालयांशिवाय पर्याय नाही.

परिसरात मनपाची फिरती आरोग्य केंद्रे आहेत, तसेच फिरता दवाखाना येऊन तपासणी करून जातो. या माध्यमातून साथरोगाचे सर्वेक्षण, लसीकरण, कुष्ठरोग निर्मूलन, किरकोळ आजारांवर औषधोपचार यांसारखी कामे केली जातात. येथील औैषधांचा दर्जाही चांगला असतो. आरोग्याची काळजी घेण्याचाही प्रयत्न कर्मचारी करतात. मात्र तज्ज्ञ डॉक्टर भेटतीलच, याची शाश्वती देता येत नाही.

नगरसेवक असताना किमान महासभेत प्रश्न मांडून काही प्रश्न सुटत तरी होते. गेल्या आठ महिन्यांत प्रशासकीय काळात त्यांच्यावर फारसा वचक दिसत नाही. येथील नागरिकांना महापालिकेचे रुग्णालय नसल्याने शक्यतो जिल्हा रुग्णालय, विभागीय संदर्भसेवा रुग्णालय, गुरुजी रुग्णालय याचा सहारा घ्यावा लागतो. म्हणूनच या भागात मनपाचे चांगले रुग्णालय असावे, अशी अनेकांची इच्छा आहे.

पश्चिम विभागात 13 झोपडपट्ट्या आहेत. त्या गरीब कुटुंंबातील मुलांना, वयोवृद्धांना उपचारासाठी चांगल्या सुसज्ज हॉस्पिटलची गरज आहे. ती गरज महापालिकेने भागवणे गरजेचे आहे. सध्या फक्त व्हॅक्सिनपुरती मर्यादित ही केंद्रे राहिली आहेत. त्यात सुधारणा गरजेची आहे.

किशोर घाटे

कंबीरनगरसारख्या भागात आठवड्यातून एखादा फिरता दवाखाना दिसतो. येथे आम्ही जागा सुचवली. साधे आरोग्य केंद्रही आजपयर्ंंत उभारले गेले नाही. झोपडपट्टी विकासाच्या नावाने ज्या जीवनावश्यक सुविधा द्यायला हव्यात त्याकडे दुर्लक्ष केले जाते.

सुभाष मुंडे

- Advertisment -

ताज्या बातम्या