Thursday, April 25, 2024
Homeनाशिकनाशिक तालुक्यातील आरक्षण जाहीर; १७ ग्रामपंचायती सर्वसाधारण, पाहा संपूर्ण यादी

नाशिक तालुक्यातील आरक्षण जाहीर; १७ ग्रामपंचायती सर्वसाधारण, पाहा संपूर्ण यादी

नाशिक | प्रतिनिधी

नाशिक जिल्ह्यातील ८१० ग्रामपंचायतींनची सरपंच आरक्षण सोडत आज पार पडत आहे. तहसील कार्यालय स्तरावर या सोडतीची घोषणा केली जात आहे. नाशिक तालुक्यातील ३५ ग्रामपंचायतींची सोडतही थोड्या वेळेपूर्वीच जाहीर झाली…

- Advertisement -

यामध्ये एका ग्रामपंचायतीची सोडत रद्द झाली आहे तर इतर ३४ ग्रामपंचायतीमध्ये आरक्षण सोडत घोषित करण्यात आले आहे.

यात एकूण १७ ग्रामपंचायतीमध्ये सर्वसाधारण आरक्षण जाहीर झाले आहे. तर नागरिकांच्या मागास वर्गासाठी ८ ग्रामपंचायतींची घोषणा करण्यात आली. उर्वरित सात ग्रामपंचायतीमध्ये अनुसूचित जातीसाठी तीन तर अनुसूचित जमातीसाठी चार ग्रामपंचायतीचे आरक्षण घोषित झाले.

आरक्षण जाहीर झालेल्या ठिकाणी लवकरच सरपंचपदाचा उमेदवार विराजमान होणार आहे. आरक्षण जाहीर होताच सदस्यांकडून फिल्डिंग लावण्याच्या हालचाली सुरु झाल्या आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या