Saturday, April 27, 2024
Homeनगरट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू !

ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू !

संगमनेर |तालुका प्रतिनिधी| Sangamner

संगमनेर (Sangamner) तालुक्यातून जाणार्‍या नाशिक-पुणे रोडवरील (Nashik Pune Road) 132 केव्ही सबस्टेशन समोर ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू (Truck Bike Accident) झाल्याची घटना घडली. सलीम ईसामुद्दीन पठाण (वय 27) असे अपघातात मृत्यू (Death) झालेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे.

- Advertisement -

सुपा औद्योगिक वसाहतीत कामगारावर चाकू हल्ला

याबाबत शहर पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, सलीम पठाण हा तरूण दुचाकीवरुन नाशिककडून संगमनेरच्या (Nashik Sangamner) दिशेने येत होता. 132 केव्ही सबस्टेशन जवळ आला असता त्याच दरम्यान ट्रक (Truck) क्रमांक (आर.जे 14 जीपी 6040) हीच्यावरील चालक याने ट्रक भरधाव वेगात चालवून दुचाकीला (Bike) धक्का दिला. त्यामुळे सलीम पठाण हा तरूण दुचाकीवरुन खाली पडला. आणि त्यास गंभीर मार लागून त्याचा मृत्यू (Death) झाला आहे.

प्राध्यापकांसाठी यापुढे संवर्गनिहाय आरक्षण, शासन अध्यादेश जारी

याप्रकरणी जाकीर पिरमहोम्मद शेख (रा.कुरणरोड) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शहर पोलिसांनी ट्रकचालकाच्या विरोधात गुन्हा रजिस्टर नंबर 364/2023 भादवि कलम 304 (अ), 279, 337, 338 मोटार वाहक कायदा कलम 184, 134 (अ)(ब), 177, 103 प्रमाणे गुन्हा दाखल (Filed a Case) केला. पुढील तपास पोलिस निरीक्षक भगवान मथुरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक फौजदार आर.एन शेख हे करत आहेत.

पहिल्याच दिवशी बदल्यांचे अर्धशतकसुनेच्या विनयभंग प्रकरणी मावस सासर्‍यास 2 वर्षाचा कारावास

- Advertisment -

ताज्या बातम्या