Friday, April 26, 2024
Homeनाशिकनाशिक पोलीस दलाला मिळणार दिलासा

नाशिक पोलीस दलाला मिळणार दिलासा

नाशिक । Nashik

राज्य शासनाने कोरोना पॉझीटीव्हीटी रेट कमी असलेल्या शहर – जिल्ह्यातील लॉकडाउन निर्बंध शिथील करण्याचा निर्णय घेतला असून यात नाशिकचा सामावेश आहे. याच परिणामी गेली दिड वर्षांपासून करोनाशी सामना करत रस्त्यांवर उतरलेल्या पोलीस दलाचा ताण कमी होऊन पोलीस अधिकारी तसेच कर्मचार्‍यांना दिलासा मिळणार आहे.

- Advertisement -

मार्च 2020 पासून लॉकडाऊन जाहिर होण्याच्या पुर्वीपासून शहर तसेच जिल्हा ग्रामिण पोलीसांनी नागरीकांमध्ये कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी बंदोबस्त तैनात केला होता. परंतु पहिल्या तसेच दुसर्‍या लाटेतही कोराना उद्रेकाचा फटका रस्त्यावरील पोलीस यंत्रणेलाही मोठ्या प्रमाणात बसला असून दुसर्‍या टप्प्यात आतापर्यंत चारशे पेक्षा अधिक अधिकारी व कर्मचारी कोरोना बाधित झाले आहेत. तर 8 जणांचा बळी कोरोनाने घेतला आहे. पोलीस आयुक्त दिपक पांडे यांनी पोलीसांसाठी स्वतंत्र कोवीड केअर सेंटर सुरू केले यामुळे पोलीस कुटुंबियांना दिलासा मिळाला होता.

मात्र पहिल्या कारोना लाटेपेक्षा दुसरी लाट भयंकर ठरली. या लाटेने एप्रिल व मे महिन्यात कोरोना बाधीत तसेच मृत्युचे अनेक उचांक मोडले. शहर तसेच ग्रामिण भागातील सर्व रूग्णालये तुडुंब भरली रूग्णांना व्हेंटीलेटर, ऑक्सीजन बेड दुर साधे बेडही मिळणे दुरापास्त झाले होते. अशा वातावरणातही नागरीकांमध्ये झपाट्याने पसरणारा कोरोना संसर्ग आटोक्यात ठेवण्यासाठी शहरातील 40 तर ग्रामिण भागातील सीमावर्ती भागात कडेकोट बंदोबस्त करत पोलीस रात्रंदिवस उभे होते.

यासह पोलीसांच्या दैनंदिन कामकाज असलेल्या कायदा व सुरक्षा व्यवस्था याकडेही पोलीस दलाला पुरेसा वेळ तसेच मणुष्यबळ उपलब्ध करता येत नव्हते. परिणामी गुंडांनी मोठ्या प्रमाणात दहशत पसरवण्याचा प्रयत्न केला. कमी मणुष्यबळातही पोलीसांनी त्यांच्यावर प्रतिबंधांत्मक कारवाया केल्या. परंतु पोलीस दल विभागल्याने तसेच कोरोना पॉझिटिव्हचे प्रमाणही मोठे असल्याने उपस्थित पोलीसांवर कामाचा मोठा ताण होता.

कोरोनाचे निर्बंध शिथील झाल्यानंतर पोलिसांना त्यांच्या कामावर लक्ष देता येणार आहे. तसेच दैनंदिन कामकाजावर त्याचा गुणात्मक परिणाम दिसण्याची शक्यता आहे. त्यामुळे लॉकडाउन निर्बंध कधी शिथील होणार याकडे पोलिसांचे लक्ष लागून आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या