Friday, April 26, 2024
Homeमुख्य बातम्याPhoto Gallery : दुबईतील मिरॅकल गार्डनच्या धर्तीवरील असे आहे नाशिकमधील 'फ्लॉवर पार्क'

Photo Gallery : दुबईतील मिरॅकल गार्डनच्या धर्तीवरील असे आहे नाशिकमधील ‘फ्लॉवर पार्क’

नाशिक | प्रतिनिधी

गुलशनाबाद म्हणून एकेकाळी ओळख असलेल्या नाशिकमध्ये रंगबेरंगी फुलांचा महोत्सव भरला आहे. दुबईच्या मिरॅकल गार्डनच्या धर्तीवर देशातील हे पहिले फ्लॉवर पार्क नाशिकमध्ये साकारण्यात आले असून राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री तथा नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते त्र्यंबकरोडवरील शुभम वॉटर पार्क परिसरात उद्घाटन झाले…

- Advertisement -

फुलांचे शहर, अर्थातच ‘गुलशनाबाद’, हे कधीकाळी नाशिकचे होते, असे सांगितले जाते की, येथील फुले दिल्लीतील तख्ताची शोभा वाढवित असत. मात्र, कालांतराने गुलशनाबाद कुठेतरी हरवले, सिमेंटचे जंगल येथेही उभे रहातेय असे वातावरण निर्माण होत असतांनाच नाशिकपासून अवघ्या काही अंतरावर तब्बल 9 एकर परीसरावर नाशिक फ्लॉवर पार्क उभे राहीले आहे.

येथे 5 लाखांपेक्षा नानाविध प्रकारच्या व रंगाच्या फुलांमध्ये साकारलेले पशु, पक्षी, डॉल, राइडस्, खाऊ गल्ली यांसारख्या गोष्टी नाशिककरांना खुणावत आहेत. येथील फुलांचे विविध रूप पाहून एका वेगळ्याच दुनियेत आल्याची अनुभूती येते.

नगरसेवक शशिकांत जाधव, त्यांचे पुत्र शंतनू आणि शुभम जाधव यांच्या प्रयत्नांतून देशातील हे पहिले फ्लॉवर पार्क नाशिकमध्ये उभे राहीले आहे. अंजनेरी हिल्स, शुभम वॉटरपार्कच्या मागे हे पार्क उभारण्यात आले असून गेली वर्षभर त्यावर संबंधितांची मेहनत सुरू होती.

आज ती प्रत्यक्षात आली आहे. फ्लॉवर पार्कचे यंदा दुसरे वर्ष आहे. यंदाचे आकर्षण म्हणजे नाशिकची ओळख असलेली वाईन, १८ फूट उंचीची वाईन बॉटल येथे साकारण्यात आली आहे. ४ व्यक्तींना बसता येईल अशी पाण्यात असलेली फुलांची बोट मध्ये फोटो काढण्याचा मोह कोणालाच आवरता येणार नाही.

अशा अनेक कलाकृति नव्याने येथे बघायला मिळतील. लहान मुलांसाठी खेळण्यासाठी यंदा मोठा ऑब्स्टॅकल कोर्स तयार करण्यात आला आहे. जेष्ठ नागरिकांसाठी व्हील चेअरची व्यवस्था देखील करण्यात आली आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा सोशल डिस्टन्सिंगचे पालन करण्यात येणार आहे. तसेच मास्कशिवाय प्रवेश बंदी करण्यात आली आहे. राज्यात असलेल्या रक्ताच्या तुडवडा भरून काढण्यासाठी अर्पण आणि जनकल्याण ब्लड बँकेच्यावतिने १०० दिवस येथे रक्तदान शिबिरही घेण्यात येणार आहे.

महोत्सवाला प्रमुख अतिथी म्हणून खासदार हेमंत गोडसे, खासदार डॉ. भारती पवार, आमदार हिरामण खोसकर, विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे, पोलीस महासंचालक प्रतात दिघावकर, जिल्हाधिकारी सूरज मांढरे, जिल्हा परिषद सीईओ लीना बनसोड, पोलीस आयुक्त दीपक पाण्डेय, पोलीस अधीक्षक सचिन पाटील, पालिका आयुक्त कैलास जाधव यांच्यासह अनेक क्षेत्रातील नामवंत व्यक्ती, वरिष्ठ अधिकारी, लोकप्रतिनिधी उपस्थित होते.

फ्लॉवर पार्कची वैशिष्ट्ये

९ एकर जागा

५ लाख रोपे

४५ विविध प्रकारचे फुलं

कोरोनाच्या मार्गदर्शन सूचनांचा वापर व सुरक्षेची काळजी

आकर्षक फुलांच्या सजावटी

विविध फुलांनी साकारलेले बोट, वाईन बॉटल, पिरामिड, हार्ट, मोर

१०० दिवस रक्तदान शिबिर

- Advertisment -

ताज्या बातम्या