Thursday, April 25, 2024
Homeनाशिकनाशिक पुर्वमध्ये सर्वाधिक ३२ टक्के रुग्ण

नाशिक पुर्वमध्ये सर्वाधिक ३२ टक्के रुग्ण

नाशिक । प्रतिनिधी Nashik

शहरात मुंबई, पुणे, ठाणे व शेजारील जिल्ह्यातून दाखल झालेल्या व्यक्तींकडुन करोना प्रादुर्भाव होत असल्याचे समोर आले होते. आता बाधीत व्यक्तींच्या संपर्कात आलेल्या कुटुंबातील सदस्य, नातेवाईक व मित्रमंडळी करोनाचे शिकार होऊन लागल्याचे समोर आले आहे. आज शहरात सर्वाधिक असे ३२ टक्के रुग्ण हे नाशिक पुर्व विभागात असले तरी पंचवटी विभाग करोना संसर्गासाठी सर्वाधिक घातक बनला आहे. दररोज मोठ्या प्रमाणात पंचवटीत नवीन रुग्ण आढळून येत आहे.

- Advertisement -

नाशिक महापालिका क्षेत्रात ६ एप्रिल रोजी पहिला करोना रुग्ण आढळून आल्यानंतर एप्रिल महिना अखेर करोना रुग्णांची संख्या केवळ १० इतकीच होती. नंतर १ ते ३१ मे या कालावधीत रग्णांचा आकडा २०४ झाला होता. आता तर १ ते ३० जुन या कालावधीत १९५८ इतके रुग्ण झाले. आता जुलैच्या ६ दिवसात ९९६ नवीन रुग्णांची भर पडुन आता रुग्णांचा आकडा ३०७४ पर्यत गेला आहे. तर आत्तापर्यत १३७ जणांचा मृत्युु झाला आहे.

शहरात सर्वात प्रथम वडाळांगांव परिसर व वडाळानाका परिसर हा मेजर हॉटस्पॉट बनला होता. आता याभागातील रुग्ण कमी होत असुन जुने नाशिक व पंचवटी विभाग मेजर हॉटस्पॉट ठरला आहे. याठिकाणी दररोज रुग्ण संख्या वाढत आहे. याच भागात दररोज दोन – तीन जणांचा मृत्यु होत आहे. शहरातील सर्व विभागातील रुग्णांचा विचार केल्यास सर्वाधिक रुग्ण हे नाशिक पुर्व विभागात असुन दुसर्‍या क्रमांकाला पंचवटी विभागाची नोंद होत आहे. एकुण रुग्णांपैकी एक तृतीयांश रुग्ण नाशिक पुर्व विभागात आढळून आले आहे.

नाशिक पुर्व विभागात सर्वात जास्त रुग्ण असले तरी सर्वाधिक हॉटस्पॉट हा पंचवटी भागातील दिंडोरीरोड व पेठरोड हा भाग झाला आहे. पंचवटीतील बहुतांशी झोपडपट्टीत आता रुग्ण आढळून येत असुन बहुतांशी भागात रुग्ण आढळून आल्याने याचा मोठा संसर्ग सुरू झाला आहे. यातील फुलेनगर भागात १३९, दत्तनगर १३, रामनगर शनिमंदिर, ३८ अशाप्रकारे रुग्ण आढळून आले आहे. तसेच याच भागातील राहुलवाडी, नवनाथनगर, भराडवाडी, वैदुवाडी, मायको दवाखान्याजवळ, क्रांतीनगर, रामवाडी अशा भागात देखील मोठ्या प्रमाणात रुग्ण आढळून येत आहे. अशाप्रकारे पंचवटीत प्रतिंबंधीत क्षेत्र व इमारती – बंगल्याची संख्या मोठ्या प्रमाणात झाली आहे.

यात मेजर हॉटस्पॉट म्हणुन पंचवटीतील पेठरोड व दिंडोरीरोड परिसर ओळखला जात आहे. या भागातील झोपडपट्टी भागात करोनाचा शिरकाव झाला असुन एकुणच या भागात तीनशेच्या आसपास नागरिकांना करोना झाला आहे. अशाप्रकारे वाढत्या संसर्गामुळे महापालिकेच्या आरोग्य विभागाची धावपळ सुरू झाली असुन हा संसर्ग रोकण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहे.

विभाग रुग्ण संख्या रुग्णांची टक्केवारी

नाशिक पुर्व ९८५ ३२. ३१

पंचवटी विभाग ८९२ २९. २१

नाशिकरोड विभाग ३६५ ११.१९

नाशिक पश्चिम २९९ ९ .८२

नवीन नाशिक २९८ १०. ००

सातपूर विभाग २११ ७. ००

- Advertisment -

ताज्या बातम्या