Tuesday, April 23, 2024
Homeनाशिकगंगापूर धरण ५८ टक्के भरले; असा आहे जिल्ह्यातील धरणांतील जलसाठा

गंगापूर धरण ५८ टक्के भरले; असा आहे जिल्ह्यातील धरणांतील जलसाठा

नाशिक | प्रतिनिधी Nashik

गंगापूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात (Watershed of Gangapur Dam) पावसाची संततधार सुरु आहे. आज सकाळी प्राप्त माहितीनुसार, गंगापूर धरण ५८ टक्के भरले आहे. जिल्ह्यातील धरणातील जलसाठा २७ टक्क्यांवरून आता ४० टक्क्यांवर येऊन पोहोचला आहे. धरणांच्या पाणीसाठ्यात वाढ झाल्यामुळे समाधान व्यक्त केले जात आहे…

- Advertisement -

गंगापूर धरणसमूहातील धरणांच्या पाणीपातळीतही वाढ (Gangapur Dam Water level) झाली आहे. धरणसमूहातील एकूण जलसाठा आता ४७ टक्क्यांवर पोहोचला आहे.

कश्यपी धरणात ३१ टक्के जलसाठा (Kashyapi Dam) आहे. तर गौतमी गोदावरी (Gautami Godavari) आणि आळंदी धरणात (Alandi Dam) अनुक्रमे ३२ आणि ४१ टक्के जलसाठा आहे.

दुसरीकडे पालखेड धरणसमूहातील (Palkhed Watershed) पालखेड धरण (palkhed dam) ३२ टक्के, करंजवनमध्ये (Karanjwan dam) ९ टक्के, वाघाड (Waghad Dam) २४ टक्के भरले आहे. तर ओझरखेड, पुणेगाव (Ojharkhed and Punegaon Dam) आणि तिसगाव (Tisgaon) ही धरणं अनुक्रमे २६, ०७ आणि ०१ टक्के भरली आहेत.

यासोबतच मोठ्या प्रकल्पातील दारणा (Darana) ७८ टक्के, भावली (Bhavali) ९२ टक्के तर मुकणे धरण ३९ टक्के भरले आहे. वालदेवीत ८१ टक्के जलसाठा आहे तर कडवा (Kadva) आणि नांदूरमध्यमेश्वरमध्ये (Nandurmadhyameshwar) अनुक्रमे २६ आणि १०० टक्के जलसाठा आहे. नांदूरमध्यमेश्वरमधून २०२ क्युसेस विसर्ग गोदावरीत केला जात आहे. याच धरणसमूहातील भोजपूर धरणा १४ टक्के भरले आहे.

यानंतर गिरणा खोरे धरण (Girna Watershed) समूहात चणकापूर (Chankapur) अजूनही १४ च टक्क्यांवर आहे. तर हरणबारी धरणा ४३ टक्क्यांवर आहे. केळझर धरणा २० टक्के भरले असून नागसाक्या अद्यापही शून्य टक्क्यांवर आहे.

दुसरीकडे खानदेशची (Khandesh) जीवनवाहिनी म्हणवून ओळख असलेल्या गिरणा धरण (Girna Dam) आता ३७ टक्के भरले आहे. अजूनही जलसाठा वाढण्याची आशा येथील नागरिकांना आहे. यासोबतच पुनद (Punad) आणि माणिकपुंज (Manikpunj) या प्रकल्पात सध्या अनुक्रमे २८ आणि ४१ टक्के जलसाठा आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या