Thursday, April 25, 2024
Homeनाशिक‘हे’ क्षेत्र वगळून अत्यावश्यक सेवांवरील बंधन मागे; जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश

‘हे’ क्षेत्र वगळून अत्यावश्यक सेवांवरील बंधन मागे; जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश

नाशिक । दि.२० प्रतिनिधी

राज्य शासनाकडून जारी करण्यात आलेल्या नियमावलीत अत्यावश्यक सेवांसाठी वेळेचे कोणतेही बंधन नसेल असे सांगण्यात आले आहे. त्या पार्श्वभूमीवर नाशिक शहर व जिल्ह्यात अत्यावश्यक सेवांसाठी सकाळी दहा ते दुपारी चार हे दिलेले बंधन मागे घेण्यात अाल्याचे जिल्हाप्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. त्यामुळे पुर्वीप्रमाणे या सेवा पूर्णवेळ सुरळीत सुरु राहणार आहे.

- Advertisement -

मात्र, राज्य शासनाने लॉकडाऊनसंदर्भात नवी सर्वसमावेशक अधिसूचना जारी केली असून यात अतिरिक्त औद्योगिक घटकांसह शेतीविषयक बाबी, बांधकाम क्षेत्र आदींना अधिक सूट देण्यात आली आहे.

ऑनलाईन आणि दूरस्थ शिक्षणाला प्रोत्साहन देण्यात आले असून ‘सोशल डिस्टन्सिंग’च्या नियमांचे पालन करून मनरेगा अंतर्गत कामे करण्याचा समावेश या अधिसूचनेत करण्यात आला आहे.

राज्य शासकीय कार्यालयांमध्ये 10 टक्के अधिकारी-कर्मचाऱ्यांची उपस्थिती अनिवार्य या अधिसूचनेद्वारे करण्यात आली आहे, त्यात नमुद बाबींना आजपासून (दि.20) अटी व शर्तीवर सूट देणेत आलेली आहे.

तथापि ही सूट ज्या भागात कन्टेनमेन्ट झोन जाहीर झालेले आहेत त्या भागात लागू असणार नाही . तसेच ज्या परिसरात नव्याने कोविड-19 चे पांझिटिव्ह रुग्ण आढळून येतील त्या भागात सदर सूट तात्काळ बंद करणेत येईल, असे आदेश जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी आज जारी केले आहेत.

शहर व जिल्ह्यात करोनाचा वाढता संसर्ग बघता अत्यावश्यक सेवांची दुकाने सकाळि दहा ते दुपारी चार या वेळेत सुरु राहतील, असे आदेश जिल्हा प्रशासनाने जारी केले होते. जिल्हाधिकारी, पोलिस आयुक्त व महापालिका आयुक्त यांनी एकत्र बैठक घेत हा निर्णय घेतला होता.

त्यामुळे किराणा दुकान, भाजीपाला व दूध विक्री आणी इतर अत्यावश्यक सेवेची दुकाने दिवसातून फक्त सहा तास खुली होती. मेडिकलला त्यातून सुट दिली होती. त्यामुळे गर्दी होणार नाहि व करोना संसर्ग टाळता येइल, हा त्या मागचा प्रमुख उद्देश होता.

मात्र, या सहा तासात वस्तु खरेदीसाठी जादा गर्दी होत होती व सोशल डिस्टनचा फज्जा उडाला होताम दरम्यान राज्य शासनाने लाॅकडाऊनमधून काही बाबींना सुट दिली आहे. त्यात अत्यावश्यक सेवेंना वेळेचे बंधन नसावे अशा सूचना देण्यात आल्या आहेत. त्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने देखील सकाळी दहा ते दुपारी चार हे वेळचे बंधन मागे घेतले आहे. त्यामुळे अत्यावश्यक वस्तू खरेदीसाठी एकाचवेळी होणारी गर्दी टाळता येणार आहे.

अत्यावश्यक सेवेसाठी वेळेचे बंधन नसावे असे शासनाने सांगितले आहे. त्यामुळे जिल्हाप्रशासनाने दिलेली सकाळी दहा ते दुपारी चारची वेळेची मर्यादा मागे घेण्यात येत आहे.

– सूरज मांढरे, जिल्हाधिकारी

जिल्ह्यातील 31 कन्टेनमेन्ट झोन असे

1. नाशिक शहर- एकूण 5- गोविंद नगर, नवश्या गणपती मंदिर परिसर, नाशिक रोड,बजरंगवाडी , संजीव नगर.

2. मालेगाव शहर- एकूण 24- अक्सा कॉलनी ,खुशामद पुरा व बेलबाग, इस्लामाबाद, गुलाबपार्क, कामालपुरा व मोमीनपुरा, नवापुरा, महेवी नगर, गुलाब पार्क, जुने आझाद नगर, कुंभारवाडा, सर्वे नं.152, सरदारनगर, मादिनाबाद, मोतीपुरा, भैकल्ला, मुस्लीमपुरा, दातार नगर, हकिमपुरा, नुरबाग, जुना आझाद, नया आझाद, सुपर मार्केट, इस्लामपुरा, ज्योतीनगर .

3. चांदवड शहर- एकूण 1- नगरपालिका क्षेत्र

4. सिन्नर तालुका- एकूण 1- वारेगाव व परिसर

अधिसूचनेद्वारे लॉक डाऊनमधून अनेक उद्योग, व्यवसाय, आस्थापना यांना सूट देण्यात आलेली आहे. परंतु ही सुट असताना देखील आजाराचा संसर्ग वाढू नये यादृष्टीने त्यावर काही निर्बंध राहणार आहेत. ते निर्बंध अधिसूचनांमध्ये स्पष्ट करण्यात आलेले आहेत, असे  मांढरे यांनी आदेशात नमुद केले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या