नववर्षाचे अनोखे स्वागत; सलग दोन दिवस एक लाख किमी सायकलिंग

jalgaon-digital
2 Min Read

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

नाशिक सायकलिस्ट फाऊंडेशनच्या (Nashik Cyclists Foundation) वतीने नेट झिरो इंडिया (Net Zero India) व आझादी का अमृत महोत्सव या उपक्रमाअंतर्गत नवीन वर्षाचे स्वागत पर्यावरणपुरक 1 लाख 5 हजार 734 कि.मी. सायकलिंग, रनिंग व वॉकिंग करून करण्यात आले. यात नाशिक सायकलिस्ट फाऊंडेशनच्या 3 हजार 165 सदस्यांनी सहभाग नोंदविला…

नाशिक सायकलिस्टस फाऊंडेशनने नववर्षाचे स्वागत एक अनोखा उपक्रम राबवून केला. याचा उद्देश जगात प्रदूषित हवामानामुळे पृथ्वीचे तापमानात प्रचंड वाढ होत आहे. त्यामुळे विविध नैसर्गिक आपत्तीला सामोरे जावे लागत आहे.

यासाठी भारतासमोर सुद्धा कठोर पावले उचलण्याची गरज निर्माण झाली आहे. म्हणून नाशिक सायकलिस्टस फाउंडेशनने नेट झिरो इंडिया ही पर्यावरणाची मोहीम सुरू केली आहे.

यात प्रत्येक नागरिकाने आपल्या दैनंदिन जीवनात सायकलचा वापर करावा व आठवड्यातून एक दिवस नो व्हिकल डे, नो फ्युएल डे, व झिरो कार्बन डे पाळून पर्यावरणाचे रक्षण करण्यात आपले योगदान द्यावे हा आहे. नववर्षाच्या पहिल्या दोन दिवसात सकाळी सहा ते संध्याकाळी सहा वाजेपर्यंत करोना नियमाचे पालन करून सायकलिंग करण्याचे आव्हान केले.

या उपक्रमात नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयातील कर्मचारी, जिल्हा परिषद कार्यालयातील कर्मचारी, शिक्षक व विद्यार्थी, नाशिक महानगरपालिका कर्मचारी, मराठा विद्या प्रसारक समाज नाशिक यांचे जिल्ह्यातील सर्व शाळेतील शिक्षक व विद्यार्थी भोसला मिलिटरी स्कूल व कॉलेजमधील शिक्षक, विद्यार्थी तसेच नाशिक जिल्ह्यातील सिन्नर सायकलिस्ट, लासलगाव, येवला, सटाणा, मालेगाव, देवळा, निफाड, मनमाड येथील सायकलिस्टने सहभाग नोंदवला.

तसेच अहमदनगर, कोपरगाव, संगमनेर, राहुरी, औरंगाबाद, जालना, जिंतूर, जळगाव, चाळीसगाव, धुळे, शिरपूर, ठाणे, नवी मुंबई, पुणे, केरळ, पंजाब, पुडुचेरी, दिल्ली, राज्यस्थान, तामिळनाडू, उत्तर प्रदेश, विविध राज्यांतील सायकलिस्ट फाऊंडेशनचे सदस्य, विदेशातील इटली, अमेरिका, ब्राझिल, नायजेरिया, व्हिएतनाम, इराक, फिलीपाईन्स व स्पेन या देशातील सायकलिस्ट सदस्यांनी आपले योगदान देऊन एक लाखांहून अधिक किमीचे लक्ष्य गाठले. व या साठी नाशिक सायकलिस्ट फाऊंडेशनच्या स्ट्रावा या ॲपचा वापर करण्यात आला.

उपक्रमाचे आयोजन नाशिक सायकलिस्टस फाऊंडेशनचे अध्यक्ष राजेंद्र वानखेड़े यांनी केले. उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी उपाध्यक्ष चंद्रकांत नाईक, उपाध्यक्ष किशोर माने, सचिव डॉ. मनिषा रौंदळ, खजिनदार रविंद्र दुसाने, संचालक मोहन देसाई, संजय पवार, जाकीर पठाण, राजेश्वर सुर्यवंशी, माधुरी गडाख, देवेंद्र भेला, सुरेश डोंगरे, गणेश कळमकर, पुष्पा सिंह, प्रशांत भागवत, यशवंत मुधोळकर, नाना आठवले, जीभाऊ माळी यांनी परिश्रम घेतले.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *