Saturday, April 27, 2024
HomeनाशिकVideo : छानच! कामगार महिलांसाठी अनोखी सायकल राईड

Video : छानच! कामगार महिलांसाठी अनोखी सायकल राईड

नाशिक । प्रतिनिधी Nashik

नवरात्री उत्सव (Navratri 2021) आरोग्याचा व पर्यावरणाचा (Awareness about environment) जागर करत साजरा करावा या हेतूने नाशिक सायकलिस्टस फाऊंडेशनच्या (Nashik Cyclist Foundation) वतीने गेल्या नऊ दिवसापासून दररोज सकाळी वेगवेगळ्या ठिकाणी सायकल राईडचे (Cycle Ride) आयोजन केले जात होते. विजयादशमीच्या निमित्ताने ज्या महिला कामासाठी सायकलवर जातात अशा महिलांचा सन्मान करण्याच्या दृष्टीने कामगार महिलांची सायकल राईड आयोजित करण्यात आली होती. तसेच अशा विशेष महिलांचे देखील पर्यावरणासाठी एक मोठे योगदान आहे….

- Advertisement -

त्यांचा उत्साह वाढावा यासाठी महिला कामगार सायकलीस्टचा सन्मान करण्यात आला. सकाळी साडेसहा वाजता जेहान सर्कल (Jehan Circle) येथून या सायकल राईड (Cycle ride) ला सुरुवात झाली. गौरी सामाजिक संस्थेच्या अध्यक्षा रोहिणी नायडू यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून या राईडची सुरुवात करण्यात आली. नाशिक सायकलिस्ट फाऊंडेशनचे ग्रुपने या विशेष महिलांचा टाळ्यांच्या गजर करत उत्साह द्विगुणित केला.

या राईडची सांगता नवशा गणपती (Nashik Navshya Ganpati) शेजारील साठे लॉन्स (Sathe Lawns) येथे झाली. गेल्या नऊ दिवसापासून नवदुर्गा सायकल राईड मध्ये सहभागी झालेल्या महिलांचा यथोचित सन्मान करण्यात आला; तसेच नवदुर्गा सायकल राईडची सांगता यावेळी करण्यात आली. या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी मयुरा सुरज मांढरे, रोहिणी नायडू, माधुरी रहाळकर, देवराम साठे हे उपस्थित होते.

नाशिक सायकलिस्ट फाऊंडेशनचे अध्यक्ष राजेंद्र वानखेडे (Nashik cyclist foundation president rajendra wankhede) यांनी महिला ही कुटुंबाची अविभाज्य घटक आहे व तिचा फिटनेस राखणे तितकंच महत्त्वाचं आहे, सायकल हा कमी खर्चिक व चांगला व्यायाम आहे. नवदुर्गा सायकल राईड मध्ये नवनवीन महिलांनी सहभाग घ्यावा व एकमेकांची प्रेरणा घेऊन आपल्या आरोग्यासाठी व पर्यावरणाच्या रक्षणासाठी सायकल हे माध्यम निवडावे या करिता या राईडचे आयोजन करण्यात आले असे सांगितले.

25 कामगार महिला या सायकल राईड मध्ये सहभागी झाल्या. शोभना मोंडकळ,.संगीता पिसाळ, सुनिता सूर्यवंशी.आरती सिंग. लक्ष्मी थापा. सविता सरडे. गंगा कोळी.चतुरा कोळी. आरती शेवाळे. शिवानी राऊत. राणी राऊत. सुमित्रा भाग्यवंत.काजल जाधव. अक्षदा जाधव. लीला वाघ. सुमन ताठे, गौरी गिते , वर्षा भालेराव, अर्चना मोरे, निमा कसबे, शीला प्रधान, सोनाली भाग्यवंत,सकुबाई भालेराव, स्मिता अंभोरे, नेहा मनेरे या महिलांचा गौरव करण्यात आला.

कामगार वर्ग हा एक आर्थिक अडचण म्हणुन सायकलचा वापर करतात, पण या सन्मानाने त्यांच्यात नक्कीच चांगली ऊर्जा निर्माण होईल व त्यांची प्रेरणा इतर घेतील. कामगार सायकल राईड ला मोठा पाठिंबा रोहिणी नायडू यांचा लाभला. गौरी गिते ते या कामगार महिलेने आपले मनोगत व्यक्त केले व व नाशिक सायकलिस्ट फाऊंडेशन टीमचे आभार मानले.

तसेच नवदुर्गा सायकल राईड बद्दल तनुजा गडकरी हिने आपले मत व्यक्त केले. त्या म्हणाल्या, वर्क फ्रॉम होम मुळे खरोखर कंटाळा आला होता. पण नवदुर्गा राईडच्या च्या माध्यमातून स्वतःच्या फिटनेस साठी वेळ काढायला शिकलो. आमचे बघून तरुणाई देखील सायकलिंगकडे आकर्षित होत आहे, असे मत मांडले.

या कार्यक्रमात लकी ड्रॉ काढण्यात आला व दोन भाग्यवंत विजेत्यांना कापसे पैठणी गिफ्ट देण्यात आली.

प्रो फिश फ़ार्मच्या संचालिका भक्ति रवींद्र दुसाने हीच्या हस्ते तीन महिलांना लकी ड्रॉ द्वारे साडी भेट देण्यात आली. प्रत्येकास अमूल समूहातर्फे गिफ्ट हॅम्पर देण्यात आले. दिव्यांग व्यक्तींनी स्वतः तयार केलेले दिवे नाशिक सायकली फाउंडेशनचे उपाध्यक्ष किशोर माने यांनी या विशेष मुलांकडून खरेदी केले व भेट म्हणून प्रत्येकाला दोन पणत्या दिवाळीनिमित्त भेट देण्यात आल्या व प्रेरणादायी पुस्तक भेट देण्यात आले.

राष्ट्रीय दृष्टिहीन संघ, महाराष्ट्र त्यांच्या संयोजनाने अंध मुलांनी स्वहस्ते तयार केलेले स्वयंसिद्ध सुगंधित सुवासिक उटणे अत्यंत अल्प दरात असल्याने प्रत्येक व्यक्तीने घ्यावे व अशा व्यक्तींना मदत करावी या दृष्टी यासाठी नाशिक सायकलिस्टस ने पुढाकार घेतला व अनेक सायकलीस्टने खरेदी केले. हा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी नाशिक सायकलिस्टस फाऊंडेशनचे ज्येष्ठ उपाध्यक्ष चंद्रकांत नाईक ,उपाध्यक्ष किशोर माने,खजिनदार रवींद्र दुसाने, संचालिका नलिनी कड, माधुरी गडाख, पुष्पा सिंग, मोहन देसाई, दविंदर भेला, जाकिर पठाण, डॉ. सोनाली पाटील, संजय पवार, प्रवीण कोकाटे, साधना दुसाने, किशोर शिरसाठ, सुरेश डोंगरे यांचे विशेष सहकार्य लाभले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नाशिक सायकलिस्टसच्या सचिव डॉ.मनिषा रौंदळ यांनी केले व आभार प्रदर्शन पुष्पा सिंग यांनी केले. कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने झाली

- Advertisment -

ताज्या बातम्या