नाशिक शहर @४८८; काल आढळून आलेल्या २६ रुग्णांची अशी आहे हिस्ट्री

jalgaon-digital
5 Min Read

नाशिक | प्रतिनिधी 

नाशिक महानगरपालिकेच्या हद्दीत करोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. कालच्या २६ रुग्णांची भर पडलेली असतानाच आज दुपारी आणखी एका रुग्णाची भर पडली आहे. एकलहरे येथील हा रुग्ण आहे. या यामुळे नाशिक महापालिका हद्दीतील रुग्णसंख्या आता ४८८ वर पोहोचली आहे. तर यामध्ये आतापर्यंत १६८ रुग्ण करोनामुक्त झाले आहेत.

नाशिक शहरात आतापर्यंत २२ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर वाढलेल्या रुग्णांच्या आकडेवारीमुळे प्रतिबंधित क्षेत्रांची संख्या वाढून ९७ वर पोहोचली आहे.

काल आढळून आलेल्या रुग्णांची हिस्ट्री अशी

१) आझाद चौक, जुने नाशिक येथील ३१ वर्षीय व्यक्तीचा अहवाल पॉझिटिव्ह आलेला आहे.त्यांच्यावर बिटको रुग्णालय करोना कक्ष येथे उपचार सुरू आहेत.

२)जयदीप नगर प्लॉट क्रमांक २३ व २४ येथील ४८ वर्षीय महिलेचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्याच्यावर समाज कल्याण वसतिगृह येथील करोना कक्ष येथे उपचार सुरू आहेत.

३)गुंजाळ वाडी,जुना आडगाव नाका येथील ४ वर्षीय बालक करोना बाधीत असल्याचा अहवाल प्राप्त झाला आहे.त्याच्यावर समाज कल्याण वसतिगृह येथील कोरोना कक्ष येथे उपचार सुरू आहेत.

४) भोरे सदन, सरदार चौक, पंचवटी येथील २१ युवक व ४० वर्षीय महिला करोना बाधीत असल्याचा अहवाल प्राप्त झाला असून आत्ता पर्यंत याच कुटुंबातील ३ व्यक्तीचा अहवाल पॉझिटिव्ह आलेला आहे.या सर्वांवर तपोवन करोना कक्ष येथे उपचार सुरू आहेत.

५) बालाजी सदन,नागचौक, पंचवटी येथील २७ वर्षीय महिला कोरोना बाधित असल्याचा अहवाल प्राप्त झाला असून या मयत करोना बाधित वृद्ध महिलेच्या संपर्कातील आहेत.यांच्या कुटूंबातील २ व्यक्ती कोरोना बाधीत असून या सर्व रुग्णांवर तपोवन कोरोना कक्ष येथे उपचार सुरू आहे.

६)आनंद छाया, सातपूर कॉलनी येथील १५ वर्षीय मुलीचा अहवाल पॉझिटिव्ह आलेला असून ते जुन्या रुग्णच्या संपर्कातील आहेत. त्यांच्यावर डॉ.झाकीर हुसेन रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

७) पंचकृष्ण बंगला काठे मळा टाकळी रोड येथील ५१ वर्षीय व्यक्तीचा अहवाल पॉझिटिव्ह आला असून त्याच कुटुंबातील २४ वर्षीय युवकाचा देखील अहवाल पॉझिटिव्ह आलेला आहे या दोघांवर डॉ.झाकीर हुसेन रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

८)सुग्रा अपार्टमेंट, ठाणे भिवंडी येथील २६ वर्षीय डॉक्टर महिला कोरोना बाधीत असल्याचा अहवाल प्राप्त झाला असून त्यानी नांदगाव नाशिक असा प्रवास केलेला आहे.त्यांच्यावर समाज कल्याण वसतीगृह येथील कोरोना कक्ष येथे उपचार सुरू आहेत.

९)जयदीप नगर प्लॉट क्रमांक २३ व २४ येथील २१ वर्षीय युवकाचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.त्यानी नांदगाव नाशिक असा प्रवास केलेला आहे. त्याच्यावर समाज कल्याण वसतिगृह येथील कोरोना कक्ष येथे उपचार सुरू आहेत.

१०) भोरे सदन, सरदार चौक पंचवटी येथील १५ वर्षीय मुलगी व ३८ वर्षीय महिला या मायलेकी कोरोना बाधीत असल्याचा अहवाल प्राप्त झाला असून याच कुटुंबातील एक व्यक्तीचा अहवाल पॉझिटिव्ह आलेला आहे. त्यांच्यावर तपोवन कोरोना कक्ष येथे उपचार सुरू आहेत.

११) बालाजी सदन,नागचौक, पंचवटी येथील ६० वर्षीय पुरुष व ३६ वर्षीय महिला करोना बाधित असल्याचा अहवाल प्राप्त झाला असून हे दोघेही मयत करोना बाधित वृद्ध महिलेच्या संपर्कातील आहेत.त्यांच्यावर तपोवन करोना कक्ष येथे उपचार सुरू आहे.

१२)आनंद छाया, सातपूर कॉलनी येथील एकाच कुटुंबातील ४० वर्षीय व्यक्ती व १३ वर्षीय मुलीचा अहवाल पॉझिटिव्ह आलेला असून ते जुन्या रुग्णच्या संपर्कातील आहेत. त्यांच्यावर डॉ.झाकीर हुसेन रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

१३)पंचकृष्ण बंगलो, टाकळी रोड,काठे मळा येथील १ वर्षीय बालक व २८ वर्षीय महिला हे दोघे कोरोना बाधित असल्याचा अहवाल प्राप्त झाला असून हे दोघे एकाच कुटुंबातील आहेत. या दोघांवर डॉ. झाकीर हुसेन रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

१४)आझाद चौक नाशिक येथील ५५ वर्षीय महिलेचा पॉझिटिव्ह अहवाल प्राप्त झाला असून जून्या रुग्णाच्या संपर्कातील आहेत त्यांच्यावर डॉ.झाकीर हुसेन रुग्णालयात उपचार सुरू आहेत

१५)पंचवटीतील ५६ वर्षीय व्यक्तीचा अहवाल पॉझिटिव्ह आलेला असून जून्या रुग्णाच्या संपर्कातील आहेत. त्यांच्यावर डॉ.झाकीर हुसेन रुग्णालय येथे उपचार सुरू आहेत.

१६) फुलेनगर,पेठरोड येथील १८ वर्षीय युवकाचा कोरोना बाधित असल्याचा अहवाल प्राप्त झाला असून त्याच्यावर डॉ.झाकीर हुसेन रुग्णालय येथे उपचार सुरू आहे.

१७) नाईकवाडी पुरा येथील ३० वर्षीय व्यक्ती कोरोना बाधीत असल्याचा अहवाल प्राप्त झाला असून त्याच्यावर डॉ.झाकीर हुसेन रुग्णालय येथे उपचार सुरू आहे.

१८)कादरी चौक, नाशिक येथील ४५ वर्षीय महिला कोरोना बाधीत असल्याचा अहवाल प्राप्त झाला असून तिच्यावर डॉ.झाकीर हुसेन रुग्णालय येथे उपचार सुरू आहे. याच परिसरातील ४५ वर्षीय वर्षीय व्यक्ती कोरोना बाधित असल्याचा अहवाल प्राप्त झाला असून त्यांच्यावर डॉ.झाकीर हुसेन रुग्णालय येथे उपचार सुरू आहे.

१९)अमरधाम रोड, कुंभारवाडा येथील २६ वर्षीय महिलेचा कोरोना बाधित असल्याचा अहवाल प्राप्त झाला असून त्यांच्यावर डॉ.झाकीर हुसेन रुग्णालय येथे उपचार सुरू आहे.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *