नरेंद्र माेदी
नरेंद्र माेदी
मुख्य बातम्या

लडाखमधून माेदींचे चीनला आव्हान

विस्तावरवादाचे युग संपले; अशा शक्ती नाहीशा झाल्या

Deshdoot Digital Team

विस्तारवादाने मानव जातीचा विनाश केला आहे. परंतु विस्तारवादी धाेरण असणाऱ्या शक्ती मिटल्या आहेत. त्यांचे युग संपले आहे, हे इतिहासातून सिद्ध झालेे आहे, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र माेदी यांनी लेहमधून चीनला दिले.

आपल्या २६ मिनिटांच्या भाषणात माेदी यांनी जवानांचे मनाैधर्य वाढवण्याचा प्रयत्न केला आणि चीनवर जाेरदार हल्ला केला. ते म्हणाले, भारताने कायम मानवतेच्या सुरक्षेसाठी काम केले आहे. संपूर्ण जगाने आपल्या जवानांचा पराक्रम पाहिला आहे. गेल्या काही काळात विस्तारवादानेच मानवतेचा विनाश केला आहे. जगाच्या विकासासाठी शांतता आवश्यक आहे. गेल्या काही काळात विस्तारवादाने मानवतेचा विनाश करण्याचे काम केले आहे. ज्यांना विस्तारवाद हवा आहे त्यांनी कायम जागतिक शांतीपुढे धोका निर्माण केला. अशी विस्तारवादी भूमिका घेणाऱ्या शक्तींचा पूर्णपणे संपल्या किंवा मागे हटल्या. यासाठी इतिहास साक्ष आहे. सपूर्ण जग आज विस्तावादाविरोधात एकवटले आहे.

Deshdoot
www.deshdoot.com