Thursday, April 25, 2024
HomeUncategorizedVideo : नांदूरमध्यमेश्वर धरणातील पाण्याचा रुद्रावतार एकदा पाहाच...

Video : नांदूरमध्यमेश्वर धरणातील पाण्याचा रुद्रावतार एकदा पाहाच…

निफाड/ करंजी खुर्द | Niphad / Karanji Khurd

नांदूरमध्यमेश्वर बंधाऱ्याचे सहा गेट पूर्ण क्षमतेने उघडण्यात आले आहेत. एकून १६ हजार ५८२ क्युसेक पाण्याचा विसर्ग सध्या गोदावरीत होत आहे. नदीकाठी सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे….

- Advertisement -

इगतपुरी, दिंडोरी व त्र्यंबकेश्वर तालुक्यातील धरणात पाणी साठा वाढल्याने दारणा धरणातून 10 हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरु आहे. गंगापूर धरणातून दुपारी दोन वाजता ३ हजार ५०० विसर्ग होत आहे तर सायंकाळी चार नंतर ४ हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग केला जाणार आहे.

तर कडवामधून २ हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग होत असून पालखेड धरणातून विसर्ग वाढवून १ हजार ३०० क्युसेक करण्यात आला आहे. हे सर्व पाणी नांदुर मध्यमेश्वर धरणात आल्याने या धरणाचे सहा दरवाजे पूर्ण क्षमतेने उघडण्यात आले असून नदीकाठी सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या