प्रतिभावंत नाना !

भविष्य आपल्या हाती
प्रतिभावंत नाना !

प्रफुुुल्ल कुलकर्णी,ज्योतिषभास्कर, सामुद्रिक मार्तंड-8888747274

नाना पाटेकर जेवढे ताकदीचे अभिनेते आहेत, तेवढेच ते मनस्वी समाजिक कार्यकर्तेही आहेत. केवळ पडद्यावर भुमिका साकार करून ते थांबले नाहीत. तर प्रत्यक्षात अनेक सामाजिक विषयांवर, समस्यांवर, प्रश्नांवर, मुद्यांवर भुमिका घेण्याचे आणि मांडण्याचे साहस त्यांनी दाखविले आहे.

किंबहूना अनेकदा आपल्या खुमासदार शैलीत राजकीय नेत्यांना चिमटे घेण्याचे धाडसही त्यांनी दाखविले. अभिनेता म्हणून त्यांनी वठवली नाही, अशी एकही भुमिका नाही. नायक, खलनायक, चरित्र अभिनेता, विनोद अशा सर्व प्रकारच्या भुमिका त्यांनी जीवंत केल्या.

त्यांचा जन्म 1 जानेवारी 1951 रोजी सध्याच्या रायगड जिल्ह्यातील मुरुड-जंजिरा येथे झाला. मुंबई येथील सर जे.जे. कला महाविद्यलयाचे ते विद्यार्थी. संघर्षाच्या दिवसात नाना सिनेमांचे पोस्टर रंगवायचे. आज स्वतंत्र शैलीचे अभिनेता म्हणून ते प्रसिद्ध आहेत. ‘गमन’ हा त्यांचा पहिला चित्रपट. आज की आवाज, अंकुश, प्रतिघात, मोहरे, अवाम अशा अनेक चित्रपटांतील त्यांच्या भुमिका गाजल्या. मक्रांतिवीरफ हा त्यांचा प्रचंड गाजलेला चित्रपट. अँग्री यंग मॅन या संकल्पनेला त्यांनी आपल्या अभिनयाद्वारे एक वेगळाच आयाम दिला.

या चित्रपटातील अभिनयासाठी त्यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा राष्ट्रीय पुरस्काराने गौरविण्यात आले. फिल्मफेअर पुरस्कार आणि स्टार स्क्रीन पुरस्कारही पटकावला. ‘परिंदा’ मधील भूमिकेसाठी त्यांना सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्याचा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळाला. ‘प्रहार’ च्या निमित्ताने त्यांनी दिग्दर्शक म्हणून चमक दाखविली.

या चित्रपटात अभिनय व दिग्दर्शनासाठी त्यांनी थेट लष्करी प्रशिक्षण घेतले होते. नाना पाटेकर यांनी आपल्या अभिनयाच्या जोरावर गाजवलेल्या चित्रपटांची एक मोठी यादीच आहे. विशेष म्हणजे त्यांचा स्वतंत्र चाहतावर्गही आहे. आज नाना आपल्या अभिनयासोबत सामाजिक कार्यातील भरीव योगदानासाठी ओळखले जातात. चित्रपटसृष्टीत सामाजिक भुमिका घेणार्‍या काही स्पष्टवक्त्या अभिनेत्यांपैकी ते एक आहेत.

वैयक्तिक जीवन

नाना पाटेकर यांचे बालपण तसे हालाकीतच गेले. वयाच्या 27 व्या वर्षी त्यांनी नीलकांती यांच्याशी लग्न झाले. नाना पाटेकर 28 वर्षांचे होते तेव्हा वडिलांचे निधन झाले. मुलाच्या मृत्यूचे दुखही त्यांच्या वाटेला आले.

नाना यांच्या अभिनयामागे वडिलांचे प्रोत्साहन होते. वडिलांना नाटकांची आवड होती आणि नाटके पाहण्यासाठी त्यांनी प्रोत्साहित केले. यातून अभिनयाबद्दलचे प्रेम विकसित झाले, अशी आठवण त्यांनी एका मुलाखतीत सांगीतली होती.

प्रहार या चित्रपटाची तयारी करण्यासाठी पाटेकर यांनी लष्कराचे ट्रैनिंग घेतल्याने त्यांना लष्कराने 1990 मध्ये भारतीय सैन्यात मानद कॅप्टन म्हणून नियुक्त केले गेले होते. 1999 मध्ये कारगिल युद्धाच्या वेळी पाटेकर यांनी मराठा लाईट इन्फंट्रीच्या रेजिमेंटमध्ये मानद मेजर म्हणून सेवा दिली.

परोपकारी

पाटेकर हे त्यांच्या साध्या जीवनशैली आणि धर्मादाय संस्थांना उदारतेने देणगी देण्यासाठी ओळखले जातात. अनुभूती या सेवाभावी संस्थेच्या माध्यमातून बिहारमधील पूरग्रस्त गावांच्या पुनर्बांधणीसाठी त्यांनी योगदान दिले.

पाठशाला या चित्रपर्टाींज्ञ मानधन त्यांनी पाच वेगवेगळ्या सेवाभावी संस्थांना देणगी म्हणून दिले. जेव्हा त्यांना राज कपूर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. तेव्हा पुरस्काराची 10 लाखांची रक्कम महाराष्ट्रातील दुष्काळ निवारणाच्या कार्यात दिली.

दुष्काळामुळे होणार्‍या कर्जबाजारीपणामुळे आत्महत्या केलेल्या शेकडो कुटुंबियांना त्यांनी आर्थिक मदत दिली. त्यांनी ऑगस्ट 2015 मध्ये विदर्भातील 62 कुटुंबांना आणि सप्टेंबरमध्ये मराठवाड्यातील लातूर आणि उस्मानाबाद जिल्ह्यातील 113 कुटुंबांना आधार देण्याचे काम आपल्या सामाजिक संस्थेच्या माध्यमातून केले. नाम फाउंडेशनच्या माध्यमातून त्यांनी उभारलेले काम राज्याला परिचित आहे.

मेहनतीचे फळ

चित्रपट सृष्टीची कुठलीही पार्श्वभूमी नसताना त्यांनी मिळवलेले अलौकिक यश, प्रसिद्धी त्यांच्या मेहनतीचे फळ आहे. नानांच्या संवादफेकीची नक्कल अनेक जण करतात. त्यातच त्यांचे वेगळेपण.

नानांचे व्यक्तिमत्व रफ आणि टफ नायकासारखे आहे. कमावलेली शरीरयष्टी व खर्जातील आवाज, भेदक डोळे या सर्व उपजत गुणांचा नानांनी अभिनयात अगदी चफखल वापर करून घेतला आहे. हस्त सामुद्रिक शास्त्रात हात हाताचा आकार, बोटे व अंगठ्याच्या आकार त्यांची लांबी रुंदी, बोटातील सांधे यांचे महत्व अधोरेखीत आहे.

हाताच्या पंज्यावरून व्यक्तीचे व्यक्तिमत्व, ऊर्जा, उत्साह, ठामपणा, थोडक्यात त्याच्या स्वभावाची उकल होत असते. कुठल्या परिस्थितीत व्यक्ती कसे वागेल, त्याचे निर्णय कसे असतील याचा अंदाज येत असतो.

नानांच्या हाताच्या पंज्याचा फोटो पाहिल्यावर आपणास अंदाज येईल की, हात मजबूत आहे. बोटे लांब व रुंद पण आहेत आणि बोटामध्ये सांधे आहेत. यामुळे नानांच्या विचारातील निश्चय व ठामपणा, विचारी प्रवृत्ती व कोणाच्याही अधिपत्याखाली राहू न शकणारी व्यक्ती, स्वतःच्या मनाचा निर्णय अंतिम मानणारे व आक्रमकता दिसून येते.

थोडक्यात नानांच्या स्वभावाची वैशिष्ट्ये चटकन लक्षात येतात. हाताचा एकूण पंजा लेचा पेचा, शक्तीहीन, बोटे नाजूक, बोटे टोकाला निमुळते होत गेलेली, अंगठा कमजोर-छोटा, बोटांमध्ये सांध्याचा अभाव दिसतो.

अशी परिस्थिती असता अशा व्यक्तींकडे निर्णयक्षमतेचा व सारासार विचार करण्याची क्षमत कमी असते. याचे विपरीत जाडजूड आकारहीन हात बोटे वक्र, हातावरील त्वचा खरबरीत अंगठा मोठा पण त्याच्यात लवचिकपणा नाही, असा असल्यास या व्यक्ती बुद्धिहीन व निव्वळ शारीरिक श्रम करत जगतात. यांच्यात विचार करण्याची क्षमता कमी असते. राग अनावर असतो.

हातांच्या आकाराचे हे वर्णन खूपच संक्षिप्त आहे. कारण हाताच्या आकाराचा अभ्यास हस्तसामुद्रिकशास्त्रात खूप मोठा व महत्वपूर्ण भाग आहे. येथे वाचकांसाठी एकच गोष्ट संगावीशी वाटते, हाताच्या पंजाची मजबुती व पकड जितकी मोठी तितकी ती व्यक्ती निर्णयक्षम, कामसू व विचारी असते. येथे एक गोष्ट महत्वाची आहे कि स्त्रियांच्या हाताचा एकंदरीत आकार हा पुरुषापेक्षा तीस ते पस्तीस टक्क्याने लहान असतो. त्यामुळे निर्णय क्षमतेवर मर्यादा येतात.

शरीरयष्टी मजबूत, अशक्त, बुटकी अशी कशीही असली तरी हाताच्या पंजाचा आकार हा व्यक्तीच्या जन्मजात प्रवृत्तीनुसार असतो. म्हणजेच उंच पुर्‍या धष्टपुष्ट व्यक्तीच्या हाताचा आकार हा नाजूक असू शकतो किंवा किरकोळ यष्टी असलेल्या व्यक्तीचा हात मजबूत असू शकतो. नानांच्या उजव्या हातावरील भाग्य रेषा मणीबंधापासून उगम पावली आहे.

कुठलाही हस्तसामुद्रिक अभ्यासक नानांचे बालपण सुख समृद्धीत गेले आहे हे ठामपणे म्हणेन. परंतु जेंव्हा भाग्य रेषा आयुष्य रेषेचा खूप जवळ असते त्या वेळेस ती आर्थिक कमतरता दाखविते, ऐश्वर्य दाखवीत नाही. ही भाग्य रेषा जसजशी आयुष्य रेषेपासून दूर जाईल त्याप्रमाणे आर्थिक क्षमतेमध्ये वृध्दी करत जाईल.

नानांच्या हातावरील भाग्य रेषा उत्तम असली तरी ती वयाच्या 35 वर्षापासून आयुष्य रेषेपासून दूर गेल्याने व शनी ग्रहाच्या सान्निध्यात सरळ झाल्याने आर्थिक लाभ मोठ्या प्रमाणावर मिळण्यास सुरवात झाली. नाना पाटेकर यांच्या हातावरील बुध रेषा अत्यंत शुभदायी आहे. त्यामुळे त्यांच्या अंगी आत्यंतिक हुशारी व शहाणपण आहे.

हृदय रेषा व मस्तक रेषा शनी ग्रहाच्या खाली खूप जवळ आल्या आहेत. त्यामुळे नाना छोट्या छोट्या गोष्टीं मनाला लावून घेतात. विवाह रेषा अशुभ झाल्यामुळे वैवाहिक सौख्यात कमतरता दाखवते. रवी रेषा बुध रवी बोटाच्या पेर्‍यापर्यंत गेल्याने ख्याती प्राप्त झाली. रवी ग्रहाचे बोट शनी बोटाच्या म्हणजे मधल्या बोटा इतके लांबीला असल्याने जुगाड प्रवृत्ती आहे. मान सन्मानाच्या भावना तीव्र करते.

वैवाहिक सौख्यात कमतरता आणते. हर हुन्नरी मात्र लहरी असा हा मराठी बाण्याचा कलाकार अभिनयात जिवंतपणा आणण्याचे कसब राखून आहे. नानांच्या अभिनयातील गुण अन्य अभिनेत्यात दिसणे कठीण आहे. याला कारण म्हणजे त्यांच्या हातावरील शुभ चंद्र ग्रह व चंद्र ग्रहावर उतरलेली मस्तक रेषा. या रेषेने नानांना प्रतिभावंत केले आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com