नामको रुग्णालय वरदान : बडगुजर

नाशिक । प्रतिनिधी Nashik

नामको चॅरिटेबल ट्रस्ट (Namco Charitable Trust) आणि नामको रुग्णालयाचे कार्य भूषणावह असून गोरगरीब आणि गरजू रुग्णांसाठी हे रुग्णालय वरदान ठरले आहे, असे मत शिवसेना (shiv sena) महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर (Sudhakar Badgujar) यांनी व्यक्त केले.

राजमल मांगीलाल चोरडिया (Rajmal Mangilal Chordia) यांच्या तृतीय स्मृतिदिनानिमित्त मातोश्री ट्रॅव्हलसच्या संचालिका निर्मला राजमल चोरडिया यांच्यातर्फे नामको रुग्णालयाला रुग्णवाहिका (Ambulance) भेट देण्यात आली. त्याच्या लोकार्पणप्रसंगी आयोजित कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून बडगुजर बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ट्रस्टचे चेअरमन सोहंनलाल भंडारी (Trust Chairman Sohanlal Bhandari) उपस्थित होते.

यावेळी ट्रस्टचे सचिव शशिकांत पारख, स्थायी समितीचे माजी सभापती अमोल जाधव, चंद्रकांत पारख, जयप्रकाश जातेगावकर, गौतम हिरण, आनंद बागमर,मुख्य कार्यकारी अधिकारी लक्ष्मीकांत पाठक, वैद्यकीय अधिक्षिका डॉ. विशाखा जहागीरदार तसेच चोरडिया कुटुंब आणि मान्यवर उपस्थित होते. ट्रस्टचे अध्यक्ष सोहनलाल भंडारी यांनी यावेळी रुग्णालयामध्ये उपलब्ध असलेल्या सुविधांची तसेच समर्पित भावनेने कार्य करणारे

डॉक्टर्स (doctor) तसेच वैद्यकीय कर्मचार्‍यांची माहिती देऊन कॅन्सरच्या रुग्णांसाठी हे हॉस्पिटल कसे लाभदायक आहे ते पटवून दिले. तसेच या रुग्णालयासाठी रुग्णवाहिका भेट देऊन मनाचा मोठेपणा दाखविणार्‍या निर्मला चोरडिया, आनंद चोरडिया, मयुर चोरडिया आणि त्यांच्या कुटुंबीयांचे भंडारी यांनी आभार मानले व ट्रस्टतर्फे त्यांचा सत्कारही करण्यात आला.


Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *