Saturday, April 27, 2024
Homeनगरनगर-पाथर्डी रस्त्यावर तीन वाहनांचा विचित्र अपघात; एक ठार, तीन जखमी

नगर-पाथर्डी रस्त्यावर तीन वाहनांचा विचित्र अपघात; एक ठार, तीन जखमी

करंजी |वार्ताहार| Karnaji

नगर-पाथर्डी रस्त्यावरील त्रिभुवनवाडी फाट्या जवळ आज रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास ट्रक-जीप व बुलेट या तीन वाहनांचा

- Advertisement -

विचित्र अपघात घडून या अपघातामध्ये एक ठार तीन जखमी झाले आहेत.

सर्व जखमींना करंजी येथील पोलिसांच्या मदतीने नगर येथील जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आले आहे. या अपघाताबाबतची सविस्तर माहिती अशी की नगर पाथर्डी रस्त्यावरील त्रिभूवनवाडी फाट्याजवळ रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास ट्रक-जीप व बुलेट या तीन वाहनाचा अपघात होऊन या अपघातामध्ये बुलेट मोटरसायकल वरील राजेंद्र देविदास पिंपळे (वय वर्षे 30) राहणार शेडाळा तालुका आष्टी हा तरुण ठार झाला आहे.

तर त्याच्यासोबतचे सुनील आप्पा काकडे (वय वर्ष 25), सागर संपत माळी (वय वर्ष 25) दोघे राहणारा गंगादेवी तालुका आष्टी गंभीर जखमी झाले आहेत. त्याच बरोबर जीप ड्रायव्हर बापू कोळसे (वय वर्ष 25) राहणार उमापूर जिल्हा बीड हा देखील या अपघातात गंभीर जखमी झाला असून त्याला देखील नगरला रुग्णालयात हलविण्यात आले आहे.

अपघाताची माहिती समजताच करंजी पोलीस आऊट पोस्टचे पोलीस कर्मचारी ईश्वर बेरड यांच्यासह आजूबाजूच्या नागरिकांनी तात्काळ जखमींना मदत करून त्यांना पुढील उपचारासाठी नगरला पाठवले त्यानंतर महामार्गावरील अपघातग्रस्त वाहने क्रेनच्या सहाय्याने बाजूला करण्यात आली. अपघातग्रस्त ट्रकमध्ये गॅस सिलेंडरच्या टाक्या होत्या. मात्र सुरक्षित राहील्याने आणखी काही मोठी घटना घडली नाही.

- Advertisment -

ताज्या बातम्या