Saturday, April 27, 2024
Homeनगरनगर पंचायत समिती सभापती, उपसभापतींचा राजीनामा

नगर पंचायत समिती सभापती, उपसभापतींचा राजीनामा

अहमदनगर (प्रतिनिधी) –

नगर तालुका पंचायत समितीच्या सभापती कांताबाई कोकाटे व उपसभापती रवी भापकर यांनी पक्षश्रेष्ठींना दिलेला शब्द पाळत

- Advertisement -

आपल्या पदाचा राजीनामा त्यांच्याकडे सपुर्द केला आहे. यावर पक्षश्रेष्ठी काय निर्णय घेतात याकडे सर्वाचे लक्ष लागू आहे.

नगर तालुका पंचायत समितीत शिवसेना-काँग्रेस यांची महाआघाडी आहे. सव्वा वर्षापुर्वि पंचायत समितीत सभापती व उपसभापती निवडताना पक्षश्रेष्ठींनी मोठी कसरत करून सव्वा-सव्वा वर्षांचा फॉम्युला समोर मांडला होता. शिवसेना जिल्हाप्रमुख प्रा.शशिकांत गाडे, जि.प.चे उपाध्यक्ष प्रताप शेळके, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष संपतराव म्हस्के, माजी सभापती संदेश कार्ले, बाळासाहेब हराळ यांच्या बैठकीत हा सव्वा-सव्वा वर्षांचा फॉम्युला ठरला होता. त्यानुसार सभापती कोकाटे व उपसभापती भापकर यांनी तालुक्यातील पक्षश्रेष्ठींकडे आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे.

नगर तालुका शिवसेनेने सभापती पदाचा मान दिला. तालुक्यातील सर्वसामान्य जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी हे पद पणाला लावले. मात्र कोरोनामुळे 9 महिने काहीच करता आले नाही. खुप काही करायचे बाकी आहे. पक्षश्रेष्ठी जो निर्णय घेतील तो मान्य असेल, असे नगर पंचायतीचे सभापती कांताबाई कोकाटे यांनी सांगितले.

- Advertisment -

ताज्या बातम्या