Wednesday, April 24, 2024
Homeमुख्य बातम्याराज ठाकरेंच्या वक्तव्यानंतर मुस्लीम पदाधिकाऱ्यांचा पक्षाला 'जय महाराष्ट्र'

राज ठाकरेंच्या वक्तव्यानंतर मुस्लीम पदाधिकाऱ्यांचा पक्षाला ‘जय महाराष्ट्र’

पुणे | Pune

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी (Raj Thackeray) नुकतेच मशिदीवरील भोंग्याबाबत एक वक्तव्य केले आहे. त्यांच्या वक्तव्यानंतर पुण्यातील (Pune) मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिली….

- Advertisement -

मनसेच्या शाखा अध्यक्षांसह इतर मुस्लिम पदाधिकाऱ्यांनी राजीनामे (Resignation) दिले आहेत. मशिदीवरील भोंगे उतरवण्याची मागणी राज ठाकरे यांनी केली आहे. या भोंग्यांना उत्तर म्हणून हनुमान चालिसा (Hanuman Chalisa) लावू असे विधान त्यांनी केले होते. यामुळे पुण्यातील मनसेच्या मुस्लीम पदाधिकाऱ्यांनी पक्ष सोडण्याचा निर्णय घेतला.

वसंत मोरे (Vasant More) यांच्याकडे माजीद शेख यांच्यासह मुस्लीम पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिले आहेत. पूर्वी पक्षाची भूमिका वेगळी होती आता पक्षाची भूमिका बदलल्यामुळे आम्ही राजीनामा देत असल्याचे पदाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.

दरम्यान, मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत अनेक भागातील कार्यकर्त्यांनी हनुमान चालिसा लावली. मनसेच्या गुढीपाडवा मेळाव्यात राज ठाकरे यांनी आक्रमक हिंदुत्वादाची भूमिका घेतली.

यानंतर मनसेच्या पदाधिकाऱ्यांकडून (MNS Workers) याची अंमलबजावणी सुरु झाली आहे. राज ठाकरेंच्या आदेशानंतर मनसे कार्यकर्ते प्रचंड आक्रमक झाले आहेत. पण मुस्लीम कार्यकर्ते नाराज झाले आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या