Tuesday, April 23, 2024
Homeमुख्य बातम्याप्रतिबंधित प्लॅस्टीक वापरणार्‍यांवर मनपाकडून कारवाई; हजारो रुपयांचा दंड वसूल

प्रतिबंधित प्लॅस्टीक वापरणार्‍यांवर मनपाकडून कारवाई; हजारो रुपयांचा दंड वसूल

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

सणासुदीच्या (festival) काळात मोठ्या प्रमाणात प्रतिबंधित प्लास्टिकचा (Banned plastic) वापर होत असल्याने महापालिकेच्या वतीने विशेष मोहीम हाती घेण्यात आली आहे.

- Advertisement -

यासाठी स्वतंत्र 14 पथके तयार करण्यात आली असून शहरातील चार विभागात कारवाई करून हजारो रुपयांचा दंड वसूल (Collection of fines) करण्यात आला आहे. पर्यावरणाच्या (environment) रक्षणासाठी नागरिकांनी देखील प्रतिबंधित प्लास्टिक (plastic) वापर करू नये, असे आवाहन महापालिकेच्या वतीने करण्यात आले आहे. मनपाने बंदी घातलेल्या प्लास्टिकचे विक्री (Sale of plastic) आणि वापर करणार्‍यांविरोधात मोहीम सुरू केली आहे.

घनकचरा व्यवस्थापन विभागाच्यावतीने (Solid Waste Management Division) सहा विभागात कारवाई सूरू करण्यात आली असुन यासाठी 14 पथके तयार करण्यात आली आहे. नाशिक पूर्व विभागात चार ठिकाणी कारवाई करून वीस हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे, तर पंचवटी (panchavati) विभागात पाच ठिकाणी कारवाई करून 25 हजार रुपये तर नाशिक रोड (nashik road) व नवीन नाशिक (navin nashik) विभागात प्रत्येकी एक कारवाई होउन प्रत्येकी पाच हजार रुपये याप्रमाणे दंड वसूल करण्यात आला आहे

याप्रमाणे एकूण 55 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. पहिल्या आणि दुसर्यांदा पकडले गेल्यास अनुक्रमे 5,000 आणि 10,000 रुपयांचा दंड ठोठावला जाणार आहे. तिसर्‍यांदा बंदी असलेल्या प्लास्टिकची विक्री-खरेदी करताना पकडलेल्या व्यापार्‍यांना 25 हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात येणार आहे. चुकीचे व्यापारी चौथ्यांदा पकडले गेल्यास त्यांच्याविरुद्ध महापालिका (Municipality) पोलिसात गुन्हे दाखल करणार आहे.

रस्त्यावर घाण करणाऱ्या नवीन नाशिक विभागातील गोविंद नगर परिसरातील एका बिल्डराकडून महापालिकेने 25 हजार रुपयांचा दंड वसूल केला आहे. काम सुरू असलेल्या ठिकाणाहून ट्रक भरून जाणाऱ्या रस्त्यावर माती तसेच दगड मुळे मुख्य रस्ता बाधित झाला होता. पर्यावरणाचे संरक्षण (Protection of environment) करण्याची प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे. यामुळे बंदी घातलेले प्लास्टिकचा वापर नागरिकांनी करू नये, तसे कोणी करत असेल तर त्याबाबत जनजागृती करून महापालिकेला सहकार्य करावे.

– डॉ. आवेश पलोड, संचालक घनकचरा विभाग मनपा नाशिक

- Advertisment -

ताज्या बातम्या