Friday, April 26, 2024
Homeनगरमहापालिका महापौर निवडणूक : महापौर पदासाठी रोहिणी शेंडगे यांच्या बिनविरोध निवडीचा मार्ग...

महापालिका महापौर निवडणूक : महापौर पदासाठी रोहिणी शेंडगे यांच्या बिनविरोध निवडीचा मार्ग मोकळा

अहमदनगर|Ahmedagar

महापालिकेच्या (AMC) महापौरपदासाठी शिवसेनेच्या रोहिणी शेंडगे (ShivSena Rohini Shendge) तर उपमहापौरपदासाठी

- Advertisement -

राष्ट्रवादीचे नगरसेवक गणेश भोसले (NCP Ganesh Bhosale) यांचे प्रत्येकी एक-एकच अर्ज आल्याने महापौरपदी शेंडगे तर उपमहापौरपदासाठी भोसले यांचा बिनविरोधचा मार्ग मोकळा झाला आहे. उद्या याबाबतची अधिकृत घोषणा प्रशासनाकडून केली जाणार आहे.

योग्य व्यवस्थापनामुळे घोडेगाव कांदा मार्केट देशभरात प्रसिद्ध – कृषीमंत्री दादाजी भुसे

आज उमेदवारी अर्ज दाखल करण्याची वेळ दीड वाजता संपली. काँग्रेसकडून (Congress) एकही अर्ज दाखल झाला नाही. त्यामुळे शिवसेनेच्या शेंडगे यांची महापौरपदी तर राष्ट्रवादीचे भोसले यांची उपमहापौर पदी बिनविरोध निवड होण्यातील अडथळे दूर झाले आहेत.

महापालिका महापौर-उपमहापौर निवडणुकीसाठी नगरमध्ये शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेसची युती झाली. ठरल्याप्रमाणे शिवसेनेचा महापौर तर राष्ट्रवादीचा उपमहापौर विराजमान होणार आहे. राष्ट्रवादीचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी पक्ष निरीक्षक अंकूश काकडे नगरमध्ये आले होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या