Friday, April 26, 2024
Homeनाशिकटीबीमुक्त भारत अभियानांतर्गंत ‘निक्षय मित्र’ नोंदणीचे मनपा आयुक्तांतर्फे आवाहन

टीबीमुक्त भारत अभियानांतर्गंत ‘निक्षय मित्र’ नोंदणीचे मनपा आयुक्तांतर्फे आवाहन

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

नाशिक शहर (nashik) व जिल्ह्यातील स्वयंसेवी संस्था, सहकारी संस्था, औद्योगिक संस्था, राजकीय पक्ष, शाळा, महाविद्यालये, नागरिक, लोकप्रतिनिधी यांना

- Advertisement -

क्षयरुग्णांना (Tuberculosis patients) मदत करण्यासाठी ‘निक्षय मित्र’ म्हणून नोंद करण्याचे आवाहन मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार (Municipal Commissioner and Administrator Dr. Chandrakant Pulkundwar), आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. बापूसाहेब नागरगोजे आणि शहर क्षयरोग अधिकारी डॉ. आवेश पलोड यांनी केले आहे. संसर्गजन्य आजारामुळे (Infectious disease) होणाऱ्या मृत्युमध्ये क्षयरोगाचा समावेश प्रमुख १० आजारांमध्ये आहे. त्यामुळे संपूर्ण जगामध्ये व भारतामध्ये क्षयरोगाचे व क्षयरोगामुळे होणाऱ्या मृत्युचे प्रमाण लक्षणीय आहे.

क्षयरुणांना उपचार कालावधीमध्ये पुरेसा पोषक आहार मिळाल्यास रोग बरे होण्याचे प्रमाण वाढते. रोगामुळे होणारी अनुषंगिक गुंतागुंत टाळता येते. उपचाराखाली असलेल्या व सामाजिक सहाय्य मिळावे यासाठी संमती दिलेल्या क्षयरुणांना उपचार कालावधीमध्ये पोषण आहार (Nutritional diet) व इतर सहाय्य मिळावे यासाठी दि. ९ सप्टेंबर २०२२ रोजी प्रधानमंत्री टीबी मुक्त भारत अभियानाची (Prime Minister’s TB Free India Campaign) सुरुवात केली आहे.

केंद्र शासनाने क्षयरुणांना प्रती व्यक्ती, प्रती महिना आवश्यक धान्य, कडधान्य, डाळी, तेल इत्यादी पोषण आहार निक्षय मित्रांच्या मदतीने देण्याचे प्रयोजन केले आहे. क्षयरुग्णांना दत्तक घेऊन पोषण आहार द्यावा जेणेकरून रोग बरे होण्याचे प्रमाण वाढेल. यासाठी शहर क्षयरोग केंद्र, जुनी महानगरपालिका इमारत, पंडित कॉलनी, नाशिक या पत्त्यावर तसेच महानगरपालिकेच्या सर्व दवाखान्यात संपर्क करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

पोषण आहार बास्केट मध्ये काय असावे

विकल्प १ (प्रौढ व्यक्तींसाठी)

  • ज्वारी/बाजरी/गहू/तांदूळ ३ किलो ग्रॅम

  • डाळ १.५ किलो ग्रॅम

  • खाद्यतेल २५० ग्रॅम

  • शेंगदाणे १ किलो ग्रॅम

विकल्प १ (लहान मुलांसाठी)

  • ज्वारी/बाजरी/गहू/तांदूळ २ किलो ग्रॅम

  • डाळ १ किलो ग्रॅम

  • खाद्यतेल १५० ग्रॅम

  • शेंगदाणे ७५० ग्रॅम

विकल्प २ (प्रौढ व्यक्तींसाठी)

  • ज्वारी/बाजरी/गहू/तांदूळ ३ किलो ग्रॅम

  • डाळ १.५ किलो ग्रॅम

  • खाद्यतेल २५० ग्रॅम

  • शेंगदाणे १ किलो ग्रॅम

  • अंडी ३० नग

विकल्प २ (लहान मुलांसाठी)

  • ज्वारी/बाजरी/गहू/तांदूळ २ किलो ग्रॅम

  • डाळ १ किलो ग्रॅम

  • खाद्यतेल १५० ग्रॅम

  • शेंगदाणे ७५० ग्रॅम

  • अंडी ३० नग

- Advertisment -

ताज्या बातम्या