Wednesday, April 24, 2024
Homeक्रीडाMI vs RR : बाद फेरीच्या शर्यतीत मुंबई इंडियन्स टिकणार का?

MI vs RR : बाद फेरीच्या शर्यतीत मुंबई इंडियन्स टिकणार का?

शारजाह | Sharjah

आयपीएल २०२१ (IPL 2021) मध्ये आज डिफेंडिंग चॅम्पियन्स मुंबई इंडियन्ससोबत (Mumbai Indians) राजस्थान रॉयल्स (Rajasthan Royals) संघाचा मुकाबला होणार आहे…

- Advertisement -

मुंबई इंडियन्स (MI) आणि राजस्थान रॉयल्स (RR) संघांसाठी आजचा सामना निर्णायक असणार आहे. आजच्या सामन्यात विजय मिळवून बाद फेरीच्या शर्यतीत टिकून राहण्यासाठी दोन्ही संघांसाठी ही अखेरची संधी असणार आहे.

आयपीएल २०२१ च्या पहिल्या हाफमध्ये पहिल्या ७ सामन्यांमध्ये ४ विजय आणि ३ पराभवांसह मुंबई संघाने दमदार सुरुवात केली होती. मात्र दुसऱ्या हाफमध्ये मुंबई इंडियन्स संघाची विजयी मोहीम फत्ते करण्यात कोलकाता नाईट रायडर्स (KKR), चेन्नई सुपर किंग्स (CSK), दिल्ली कॅपिटल्स (DC) आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळूर (RCB) संघांना यश मिळाले आहे. तर पंजाब किंग्जविरुद्ध झालेल्या सामन्यात मुंबईला एकमेव विजय नोंदवता आला आहे.

दरम्यान कोलकाता नाईट रायडर्स संघाने सनराईझर्स हैद्राबाद (SRH) संघावर रोमहर्षक विजय नोंदवल्यामुळे मुंबई इंडियन्स संघाला आपले उर्वरीत सामने मोठ्या फरकाने जिंकावे लागणार आहे. कारण त्यांची धावगती इतर संघांच्या तुलनेत सर्वात कमी आहे.

मुंबई इंडियन्स संघाचे सर्वच फलंदाज मागील सर्व सामन्यांमध्ये कमालीचे अपयशी ठरले आहेत. त्यांच्या फलंदाजीत सातत्याचा अभाव दिसून आला आहे. आजच्या सामन्यात मुंबई इंडियन्स संघाचे सर्व फलंदाज फॉर्मात परतणार का? ते पाहणे महत्वाचे ठरणार आहे. आजच्या सामन्यात गोलंदाजांकडून मुंबईला सातत्य अपेक्षित असणार आहे.

दुसरीकडे राजस्थान रॉयल्स संघाने बलाढ्य चेन्नईला (CSK) नामावल्यामुळे त्यांचे हौसले बुलंदीवर आहेत. युवा सलामीवीर इविन लुईस आणि यशस्वी जयस्वाल यांनी पहिल्या ५ षटकांमध्ये १९० धावांच्या डोंगराचा पाठलाग करताना बिनबाद ७५ धावांची आकर्षक सुरुवात करून दिली होती.

त्याला कर्णधार संजू सॅमसन आणि इतर फलंदाजांनी सुरेख साथ दिल्यामुळे राजस्थानला रॉयल विजय नोंदवून दिला होता. आता मुंबईवर मात करून बाद फेरीसाठी आपला दावा अधिक मजबूत करण्यासाठी राजस्थान सज्ज आहे. दोन्ही संघांमध्ये अनेक युवा आणि अनुभवी खेळाडू असल्यामुळे सामना चुरशीचा होईल अशी आशा आहे.

सलिल परांजपे, नाशिक

- Advertisment -

ताज्या बातम्या