Wednesday, April 24, 2024
Homeमुख्य बातम्यानवाब मलिक यांना हायकोर्टाचा झटका ; 'त्या' प्रकरणातील जामीन अर्ज फेटाळला

नवाब मलिक यांना हायकोर्टाचा झटका ; ‘त्या’ प्रकरणातील जामीन अर्ज फेटाळला

मुंबई | Mumbai

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आणि माजी मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांना कोणताही दिलासा देण्यास हायकोर्टाने (Mumbai Highcourt) नकार दिला आहे. मलिक यांना जामीन अर्ज कोर्टाने फेटाळला आहे.वैद्यकीय कारणास्तव सध्या रुग्णालयात दाखल असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिकांनी वैद्यकीय कारणास्तव (Medical Condition) जामीन मंजूर व्हावा अशी मागणी त्यांनी जामीन अर्जातून केली होती.

- Advertisement -

किडनी विकाराने ग्रस्त मलिकांनी ट्रान्सप्लांटसाठी कोर्टाकडे जामीनाची मागणी केली होती. मात्र या मागणीला ईडीने जोरदार विरोध केला होता. गेले वर्षभर मलिक हे त्यांच्या मर्जीतल्या रूग्णालयात उपचार घेत असून त्यांच्या उपाचारांत कधीही तपासयंत्रणेने आडकाठी केली नाही. तसेच एका किडनीवरही आयुष्य जगता येते, तसेच कोणताही वैद्यकीय अहवाल मलिकांची दुसरी किडनी केवळ ६० टक्के कार्यरत असल्याचे सिद्ध करत नसल्याचा दावाही ईडीने केला होता.

आमदार बच्चू कडूंची मोठी घोषणा ; म्हणाले, माझा निर्णय..

यासोबतच, आर्थिक गैरव्यवहार प्रतिबंधक कायद्याच्या कलम ४५ नुसार १६ वर्षांपेक्षा कमी वयाचा आरोपी, महिला आरोपी किंवा आजारी आरोपींना जामिनाची तरतूद असल्याकडेही देसाई यांनी न्यायालयाचे लक्ष वेधले होते. मात्र हायकोर्टाने ईडीचा युक्तिवाद मान्य करत नवाब मलिकांची याचिका फेटाळून लावली. मात्र नवाब मलिकांनी गुणवत्तेच्या आधारावर दाखल केलेल्या नियमित जामीन अर्जवर दोन आठवड्यांनी सुनावणी घेण्याचे हायकोर्टाने मान्य केलेय.

नवाब मलिक यांची एक किडनी निकामी झाली असून ते सध्या एकाच किडनीवर आहेत. मात्र तरीही ईडी त्यांच्या रूग्णालयातील डिस्चार्जसाठी घाई करत असल्याचा दावा त्यांच्यातर्फे जेष्ठ वकील अमित देसाई यांनी केला. नवाब मलिक हे सध्या कुर्ला येथील क्रिटी केअर रूग्णालयामध्ये दाखल आहेत. मात्र किडनी ट्रान्सप्लांटसाठी त्यांना अन्य मोठ्या रूग्णालयात उपचार सुरू करायचे आहेत अशी माहिती त्यांनी हायकोर्टाला दिली होती.

Cabinet Expansion : राज्य सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार पुन्हा लांबणीवर; खातेवाटपाचा तिढा लवकरच सुटणार

यासोबतच, जामीन नाकारताना मुंबई हायकोर्टाने मेरिटच्या आधारे दोन आठवड्यांनी जामीन अर्जावर सुनावणी घेणार असल्याचे म्हटले आहे. नवाब मलिक हे मनी लाँड्रिंग प्रकरणात फेब्रुवारी २०२२ पासून कोठडीत आहेत. सध्या ते वैद्यकीय कारणास्तव रुग्णालयात उपचार घेत आहेत.

कोणत्या प्रकरणात मलिक अटकेत आहे

अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या मालमत्तांशी संबंधित आर्थिक गैरव्यवहाराप्रकरणी अटकेत असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांना आर्थिक गैरव्यवहाराप्रकरणी ‘ईडी’ने कारवाई करत मलिक यांना मनी लाँड्रिंग प्रकरणी २३ फेब्रुवारी रोजी अटक केली होती. मुंबई सत्र न्यायालयाच्या विशेष न्यायालयाने मलिक यांचा जामीन अर्ज फेटाळून लावल्यानंतर त्या निर्णयाला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले असून त्यावर मंगळवारी न्यायमूर्ती अनूजा प्रभूदेसाई यांच्यापुढे सुनावणी झाली.

कोर्ट काय म्हणाले

मलिक यांनी वैद्यकीय स्थिती लक्षात घेऊन जामीनासाठी अर्ज केला होता. तेव्हा, ईडीने मलिक यांच्या वैद्यकीय चाचणीचे अहवाल मागितले होते. मात्र, ईडीच्या मागणीला मलिक यांनी विरोध केला. मलिक हे गंभीररित्या आजारी असतील तर त्यांनी स्वतःहून तपासयंत्रणेला अहवाल देणे आवश्यक होते. मात्र नवाब मलिक यांच्या वैद्यकीय स्थितीचा अहवाल सादर न केल्यामुळे तसेच वैद्यकीय मंडळाने मलिक यांची तपासणी न केल्यामुळे हा जामीन अर्ज फेटाळण्यात येत आल्याचे विशेष न्यायालयाने आपल्या आदेशात नमूद केलेले होते.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा...

- Advertisment -

ताज्या बातम्या