Wednesday, April 24, 2024
Homeदेश विदेशमुंबई हल्ल्याचा मास्टरमाइंड लखवीला १५ वर्षांची शिक्षा

मुंबई हल्ल्याचा मास्टरमाइंड लखवीला १५ वर्षांची शिक्षा

इस्लामाबाद:

मुंबईवरील २६/११ च्या हल्ल्याचा मास्टरमाइंड जकीउर रहमान लखवीला अखेर पाकिस्तान न्यायालयाने शिक्षा ठोठावली आहे. त्याला टेरर फंडीग व दहशतवाद्यांना मदत करण्याच्या प्रकरणात १५ वर्षांची शिक्षा व दंड झाला आहे.

- Advertisement -

मुंबईत २६ नोव्हेंबर २००८ मध्ये हल्ले झाले होते. या हल्ल्यात १६६ लोकांचा मृत्यू झाला होता आणि ३०० लोक जखमी झाले होते. जकीउर रहमना लखवी हा या हल्ल्याचा मास्टरमाइंड होता. त्याला टेरर फंडीग व दहशतवाद्यांना मदत करण्याच्या प्रकरणात काही दिवसांपुर्वी लखवीला अटक करण्यात आली होती. या प्रकरणात लाहोर न्यायालयाचा निर्णय आला आहे. न्यायालयाने त्यांना १५ वर्षांची शिक्षा व दंड केला आहे.

का झाली शिक्षा

पाकिस्तान दहशतवाद्यांचा पाठिराखा देश आहे. परंतु आता लखवील शिक्षा झाली. कारण फेब्रवारी महिन्यात फायन्सल एक्शन टॉस्क फोर्स (FATF)ची बैठक होणार आहे. ही संस्था दहशतवाद्यांविरोधात लढण्यासाठी निधी देते. पाकिस्तानात दहशतवाद्यांसाठी पोषक वातावरण असल्यामुळे तो ग्रे लिस्टमध्ये जाण्याचा धोका आहे. यामुळे पाकिस्ताने दहशतवाद्यांवर कारवाई केली जात असल्याचा देखावा तयार केला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या