Thursday, April 25, 2024
Homeनगरमुळा धरण भरताच बारागाव नांदूर ग्रामस्थांनी घेतला गुळवणीचा आस्वाद

मुळा धरण भरताच बारागाव नांदूर ग्रामस्थांनी घेतला गुळवणीचा आस्वाद

बारागाव नांदूर |वार्ताहर| Baragav Nandur

मुळा धरण पूर्णक्षमतेने भरल्यानंतर बारागाव नांदूर ग्रामस्थांनी एकत्र येत गुळवणी पुरीचा आस्वाद घेत

- Advertisement -

आनंदोत्सव साजरा केला. श्रीरोकडेश्वर महाराज मंदिराच्या प्रांगणात दरवर्षी धरण पूर्ण क्षमतेने भरावे व शेतकर्‍यांना लाभ व्हावा, अशी प्रार्थना ग्रामस्थांनी केली.

मुळा धरण भरावे अशी प्रार्थना जिल्हाभरात केली जाते. बारागाव नांदूर येथील अ‍ॅड. पंढरीनाथ पवार यांनी मुळा धरण भरल्यानंतर गावातील समस्त गावातील ग्रामस्थ एकत्र येत आनंदोत्सव साजरा करण्याची प्रथा सुरू केली.

त्या प्रथेनुसार गावातील सोपानराव गाडे, तनपुरे कारखान्याचे माजी संचालक श्रीराम गाडे यांनी ग्रामस्थांसाठी श्री रोकडेश्वर महाराज मंदिर स्थळी गुळवणी, पुरी, चटणीचे नियोजन आयोजित केले होते. कार्यक्रमासाठी गावातील समस्त ग्रामस्थ एकवटले होते. याप्रसंगी तंटामुक्त समितीचे अध्यक्ष शिवाजीराजे पवार यांनी सांगितले, गावाला माजी आमदार कै. का.ल.पवार, कै. सर्जेराव पाटील गाडे, कै. मच्छिंद्र गाडे यांनी एकोप्याची शिकवण दिली.

बारागाव नांदूर गावाने पूर्वीपासूनच जिल्ह्याला चांगले नेतृत्व दिले आहे. जिल्ह्याच्या हितासाठी गावाचे योगदान महत्त्वाचे आहे. मुळा धरणामुळे नगर जिल्ह्यातील दक्षिण पट्ट्याला मोठा लाभ होणार आहे. यामुळे धरण दरवर्षी भरावे, अशी प्रार्थना केली जाते. बारागाव नांदूर ग्रामस्थांकडून धरण भरण्यासाठी गावातील सर्वधर्मिय लोकांकडून देवाकडे प्रार्थना केली जाते.

तीन वर्षांपासून पाण्याची परिस्थिती चांगली असून ती आगामी काळातही चांगली रहावी म्हणून ग्रामस्थ आपली प्रथा पूर्ण करणार असल्याचे सांगितले. पुढील वर्षी धरण भरल्यास गावातील ग्रामस्थांसाठी गुळवणी व पुरवणी जेवणाचे नियोजन करण्याचा विडा विश्वास तात्या पवार, किशोर कोहकडे यांनी हाती घेतला.

याप्रसंगी शब्बीर देशमुख, जिल्हा परिषद सदस्य धनराज गाडे, प्रभाकर गाडे, वसंत गाडे, सेवा संस्थेचे अध्यक्ष बाळासाहेब गाडे, हमीदभाई इनामदार, बाबाभाई ईनामदार, उपसरपंच इजाज सय्यद, युवराज गाडे, जालिंदर गाडे, निवृत्ती देशमुख, बाळासाहेब पवार, दिलीप कोहकडे, गोवर्धन गाडे, यांसह ग्रामस्थ उपस्थित होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या