उघड्या रोहित्रास मनसेने घातला हार

jalgaon-digital
1 Min Read

अहमदनगर (प्रतिनिधी) –

सिव्हील हडको परिसरातील भगत मळा याठिकाणी असणार्‍या वीज खांबावरील उघड्या रोहित्रास हार घालून गांधीगिरी

मनसेच्या वतीने आंदोलन करण्यात आले.

या आंदोलनात मनसेचे उपशहर अध्यक्ष ऋषिकेश लद्दे, अक्षय बरकसे, शामराजे निंबाळकर, विकी निक्रड, विकी बरकसे, सौरभ सोनार, शुभम आव्हाड, धनंजय गायकवाड, अनंत पालवे, सुमित साळवे, वैभव तिजोरे, मुन्ना शेख, राहुल कुमार, प्रसाद व्यवहारे, मुस्ताकिम सय्यद, साहिल गवारी, संजय बोत्रे, इम्रान शेख आदी उपस्थित होते.

सिव्हील हडको परिसर असून म्हाडाच्या रहिवासी वसाहती आहेत. या ठिकाणी अनेक लहान मुले खेळत असतात. या ठिकाणी असणारे खांबावरील रोहित्र उघडे असून विजेवरील अनेक तारा देखील तुटलेल्या आहेत, त्यामुळे मोठा अनर्थ होऊ शकते. सावेडी उपनगर कार्यालयातील अधिकार्‍यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र संबंधित अधिकार्‍यांचा फोन बंद असल्यामुळे संपर्क होऊ शकला नाही. त्यामुळे त्यांनी संबंधित ठिकाणी जाऊन येथील रहिवाशांचे सोबत घेऊन वीज वितरणच्या गलथान कारभाराविरोधात सदरील खांबाला हार घालून गांधीगिरी आंदोलन करण्यात आले.असल्याचे लद्दे यांनी सांगितले.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *