Friday, April 26, 2024
Homeनगरखासदार सुप्रिया सुळे मंगळवारी नगर दौर्‍यावर

खासदार सुप्रिया सुळे मंगळवारी नगर दौर्‍यावर

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे (NCP MP Supriya Sule) मंगळवारी अहमदनगर दौर्‍यावर (Ahmednagar Tour) येणार आहे. शासकीय विश्रामगृह (Government Rest House) येथे सकाळी 8 वाजता येणार असुन आमदार संग्राम जगताप (MLA Sangram Jagtap) यांच्या कार्यालयामध्ये साडेनऊ वाजता चार्टर अकाउंटंन संघटनेची (Chartered Accountants Association) बैठक घेणार आहेत.

- Advertisement -

त्यानंतर साडेदहाच्या सुमारास रयत शिक्षण संस्थेच्या (Rayat Shikshan Sanstha) जिल्हा कार्यालयात चव्हाण सेंटर व यशस्विनी अभियान बैठकीचे आयोजन केले आहे. दुपारी साडेबाराच्या सुमारास आदेश चंगेडिया यांच्या घरी राखीव, दुपारी पावणे दोनच्या सुमारास हातमपूर येथील वास्तु संग्रहालयास भेट देणार आहे.

नंतर अडीचच्या सुमारास राष्ट्रवादी भवन (Nationalist Building) येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष व शहर पदाधिकार्‍यांचा संवाद, साडेतीनच्या सुमारास ग्रामीण पदाधिकार्‍यांचा संवाद तर पाचच्या सुमारास पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या