Wednesday, April 24, 2024
Homeमुख्य बातम्याखासदार राऊतांचा भाजपला ‘दे धक्का’

खासदार राऊतांचा भाजपला ‘दे धक्का’

नाशिक | फारूक पठाण Nashik

नाशिक महापालिका निवडणूक NMC Upcoming Elections आता अगदी जवळ आली आहे, मात्र त्याची तयारी गत दोन वर्षापासून विविध राजकीय पक्षांसह प्रशासकीय पातळीवर सुरू होती. नाशिक मनपात सत्ता काबीज करण्यासाठी सर्वच राजकीय पक्षांच्या नेत्यांनी Political Parties Leaders जोर लावला आहे. तर यामध्ये शिवसेना Shivsena सर्वात पुढे असल्याचे दिसत आहे. शिवसेना नेते खा. संजय राऊत सतत नाशिक दौरे करीत आहेत. प्रत्येक दौर्‍यात ते भाजपला धक्का देत असल्याचे दिसून येत आहे.

- Advertisement -

खा. संजय राऊत MP Sanjay Raut यांचा दौरा व भाजपला दणका या पध्दतीने काम सुरू असल्याचे दिसत आहे. नाशिक मनपात एक हाती सत्तेत असलेल्या भाजपदेखील निवडणूक कामात मागे नाही. तसेच राष्ट्रवादी काँग्रेस ,काँग्रेस, महाराष्ट्र नवनिर्माण सेनासह आदी पक्षांचे नेते व पदाधिकारी देखील मनपा निवडणुकीच्या कामाकडे विशेष लक्ष देत आहे.

2019 सालची विधानसभा निवडणूक युती म्हणून लढविण्यात आल्यानंतर मुख्यमंत्री पदावरुन निर्माण झालेला वाद इतका ताणला गेला की सुमारे 24 वर्षांची युती एका झटक्यात तुटली. विशेष म्हणजे शिवसेना पक्ष केंद्रातील एनडीए मधूनही बाहेर पडला. केंद्रात मंत्रीपदाचा राजीनामा देण्यात आला. यानंतर शिवसेनासह राष्ट्रवादी काँग्रेस व काँगे्रस यांनी एकत्रित येऊन महाविकास आघाडीची स्थापना केली.

यानंतरपासून सेना विरुध्द भाजप असा जबरदस्त संघर्ष सुरू झाल्याचे पहायला मिळत आहे. ना. राणेंच्या प्रकरणानंतर तर नाशिकच्या भाजप मुख्यालयावर थेट शिवसैनिकांनी हल्लाच चढवला होती. या संघर्षाच्या वातावरणात नाशिकमध्ये सत्तेत असलेल्या भाजप हटवून सत्ता आपल्या हातात घेण्यासाठी शिवसेना पुर्ण शक्ती लावत आहे.

यामुळेच नाशिकमध्ये गत काही वर्षात सेना नेते सतत दौरे करीत आहेत. विशेष म्हणजे खा. राऊत यांचा दौरा हमखास होत आहे. खा. राऊत प्रत्येक दौर्‍यात भाजपला धक्का देत असल्याचा अनुभव येत आहे. 2021 वर्षाच्या सुरुवातीला भाजपला मोठा धक्का देत नाशिकमधील दोन दिग्गज नेत्यांचा शिवसेनेत प्रवेश झाला. यात शिवसेना, मनसेना व नंतर भाजप असा प्रवास करणार्‍या माजी आमदार वसंत गिते व भाजप प्रदेश उपाध्यक्ष झालेल्या सुनिल बागुल या दोघा नेत्यांची घर वापसी खा. राऊत यांनी करुन घेतली. त्यावेळेपासून आता पर्यंत प्रवेशांचा सिलसिला सुरूच आहे.

दोन दिवसांपुर्वी नाशिकचे माजी महापौर दशरथ पाटील यांचे पुत्र युवानेते प्रेम पाटील यांनी समर्थकांसह शिवसेनेत प्रवेश केला. खा. संजय राऊत यांनी शासकीय विश्रामगृह येथे त्यांना शिवबंधन बांधून स्वागत केले. यावेळी आ. नरेंद्र दराडे, सुहास कांदे, माजी महापौर विनायक पांडे, महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर, अजय बोरस्ते, विलास शिंदे, विजय करंजकर उपस्थित होते. सातपूर, शिवाजीनगर परिसरात पाटील यांचे मोठे सामाजिक कार्य आहे.

यापूर्वी दशरथ पाटील यांनी शहरात महापौर म्हणून चांगले काम केले. लोकसभा निवडणुकीत थोड्या मताने त्यांना विजयाने हुलकावणी दिली होती. आगामी महापालिका निवडणुकीत या प्रवेशामुळे राजकीय वातावरण ढवळून निघणार आहे. विशेष म्हणजे प्रेम यांचे सख्ये काका दिनकर पाटील हे भाजपमध्ये असून त्यांचा मुलगा अमोल देखील भाजपकडून आगामी मनपा निवडणुकच्या मैदानात उतरण्याची तयारी करीत आहे. या पार्श्वभुमीवर प्रेम यांच्या सेना प्रवेशाने भाजपला एक मोठा धक्का मानला जात आहे.

18 नगरसेवक संपर्कात

नाशिकमध्ये एका कार्यक्रमात नाशिकमधील भाजपचे 18 नगरसेवक संपर्कात असल्याचे खा. राऊत यांनी सांगितले होते. यामुळे राजकीय वातावरण तापले होते. मात्र जो पर्यंत वॉर्ड भेटणार्‍यांमध्ये भाजप नगरसेवक असलेले माजी उपमहापौर प्रथेमश गिते, स्थायी समिती सभापती गणेश गिते यांची नावे चर्चेत आहे.

कोअर कमिटीत नव्या-जुन्यांचा मिलाप

खा. संजय राऊत यांनी माजी आ. गिते व बागुल यांचा प्रवेश झाल्यानंतर नाशिक मनपा निवडणुकीसाठी पक्षाची एक कोर कमिटी तयार केली आहे. यामध्ये नवीन व जुने नेत्यांचा समावेश करण्यात आला आहे. यामुळे पक्षातील गटबाजी व अंतर्गत वाद अत्यंत कमी होऊन पक्षाचे सर्व नेते सध्या एक दिलाने काम करीत आहे. खा. राऊतांच्या प्रत्येक दौर्‍यांकडे यामुळेच विशेष लक्ष लागून राहत आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या