Thursday, April 25, 2024
Homeनगरउद्घाटनाअगोदरच जुन्या ठेकेदाराने निळवंडे डाव्या कालव्याचे सुरू केले काम

उद्घाटनाअगोदरच जुन्या ठेकेदाराने निळवंडे डाव्या कालव्याचे सुरू केले काम

पिंपरी निर्मळ |वार्ताहर| Pimpari Nirmal

निळवंडे डाव्या कालव्याच्या 85 किलोमीटरच्या पृच्छ कामाच्या उद्घाटनाअगोदरच जुन्या ठेकेदाराने काम सुरू केेले.

- Advertisement -

त्यामुळे उद्घाटनासाठी येणारे खा. लोखंडे व कार्यकर्ते संतप्त झाले. त्या कामाबाबत आक्षेप घेत राहाता तालुक्यातील निर्मळ पिंपरी येथे 400 के.व्ही महावितरण स्टेशनजवळ खा. लोखंडे यांच्या उपस्थितीत लाभार्थी ज्येष्ठ शेतकर्‍यांच्या हस्ते कामाचा शुभारंभ करण्यात आला.

उद्घाटनाअगोदरच जुन्या ठेकेदाराने हे काम कोणत्या आधारावर व कोणाच्या परवानगीने केले. याबाबत माहिती मिळू शकली नाही. मात्र त्याने निळवंडे लाभक्षेत्रातील शेतकरी मोठ्या आशेने 50 वर्षापासून चातकाप्रमाणे निळवंडेच्या पाण्याची वाट पाहत असून खा. सदाशिव लोखंडे यांनी स्वतः उपस्थित राहून कालव्याच्या पृच्छ कामाचे उद्घाटन केल्याने लाभक्षेत्रातील शेतकर्‍यांना मोठा आनंद झाला आहे.

जून 2022 पर्यत निळवंडे लाभक्षेत्रात पाणी देण्याचे महाविकास आघाडी सरकारचे नियोजन असून अर्थसंकल्पात भरीव तरतूद करण्यात आली आहे. त्याअनुषंगाने मुख्य कालव्याबरोबरच पृच्छ व विविध कालवा शाखांची कामे प्रगतिपथावर आहेत. डाव्या कालव्याच्या 85 किलोमीटरच्या पुढील भागाचे टेंडर एक वर्षापूर्वी निघाले होते. हे काम जळगावच्या एमएस कन्स्ट्रक्शन कंपनीला मिळाले होते. मात्र कोव्हिडच्या पार्श्वभूमीवर सरकारने एक अध्यादेश काढून नवीन कामे सुरू न करण्याचे आदेश दिले होते. गेली दोन महिन्यांपूर्वी सरकारने या अध्यादेशाला शिथिलता आणून काही कामे सुरू करण्यास परवानगी दिली. दोन महिन्यांपूर्वीच या कालव्याचे काम सुरू होणे अपेक्षित होते. मात्र काही तांत्रिक अडचणीमुळे लांबणीवर पडले होते.

याप्रसंगी निळवंडे कृती समितीचे अध्यक्ष नानासाहेब शेळके, सचिव उत्तमराव घोरपडे, अण्णासाहेब वाघे, जिल्हा काँग्रेसचे सरचिटणीस श्रीकांत मापारी, सोमनाथ गोरे, सौरभ शेळके, विठ्ठल शेळके, शिवाजी शेळके, विलास गुळवे, राजू निर्मळ, प्रभाकर गायकवाड, शिवसेना नेते बाबासाहेब पठारे, राधु राऊत, बाबासाहेब झुरळे, बाळासाहेब घोरपडे, दत्तू झुरळे, अशोक गोरे याच्यासह लाभक्षेत्रातील शेतकरी उपस्थित होते. सदर उद्घाटन कार्यक्रम सोशल डिस्टन्सिंगचे पालन करून करण्यात आला.

- Advertisment -

ताज्या बातम्या