Friday, April 26, 2024
Homeनाशिकनगरपंचायतीसाठी इच्छूकांच्या हालचाली

नगरपंचायतीसाठी इच्छूकांच्या हालचाली

दिंडोरी। प्रतिनिधी

दिंडोरी नगरपंचायतीच्या विदयमान संचालक मंडळाची मुदत येत्या जानेवारी महिन्यात संपत असुन इच्छूक नेत्यांंनी पॅनलनिर्मितीसाठी चाचपणी सुरु केली आहेे.

- Advertisement -

दिंडोरी शहर नगरपंचायत स्थापनेस पाच वर्ष पुर्ण होत आहे. या दरम्यान पहिला नगराध्यक्ष होण्याचा मान भाऊसाहेब बोरस्ते यांना मिळाला. त्यानंतर पहिल्या महिला नगराध्यक्ष होण्याचा मान रचना जाधव यांना मिळाला. सध्या प्रभारी नगराध्यक्ष म्हणुन कैलास मवाळ काम पहात आहे.यापुर्वी सचिन देशमुख यांनाही प्रभारी नगराध्यक्ष म्हणुण काम करता आले आहे.

सध्या चार महिन्याचा कालावधी निवडणुकीसाठी शिल्लक राहिलेला आहे. करोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता विदयमान संचालक मंडळाला मुदत वाढ मिळण्याची शक्यता नाकारता येत नसली तरी निवडणुक आयोगाने जिल्हयातील निफाड, येवला, पेठ, सुरगाणा, कळवण येथील पुर्व तयारी सुरु केली आहे.

दिंडोरी शहरात निवडणुक आयोगाच्या हालचाली नसल्या तरी इच्छुकांच्या हालचाली गतिमान झाल्या आहे. प्रभाग रचना व आरक्षण बदलाबाबत अदयाप काहीही सुचना नाही. परंतु प्रभाग व आरक्षण न बदलता फक्‍त स्त्री किंवा सर्वसाधारण जागा होईल या शक्यतेनेच सर्व इच्छुक उमेदवार कामाला लागलेले दिसुन येत आहे.

नेत्यांच्या अजेंड्यावर उमेदवारांची यादी तयांर करण्याचे काम सुुरु आहे.त्यामुळे कोणत्या प्रभागात कोणता उमेदवार योग्य राहिल याची चाचपणी केली जात आहे. यंदा पक्षावर निवडणूका लढवायच्यां की वेगवेगळ्या पक्षातुन आपले माणसे निवडुन आणायची यावरही खलबते सुरु आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या