Wednesday, April 24, 2024
Homeनाशिकबँक कारभार विरोधात आंदोलन

बँक कारभार विरोधात आंदोलन

सुरगाणा । प्रतिनिधी Surnagan

नोटाबंदी (Denomination) पाठोपाठ देना बँकेचे (Dena Bank) रुपांतर बडोदा बँकेत (Baroda Bank) झाल्याने सर्वसामान्य जनतेला व्यवहार करताना हाल अपेष्टा सहन कराव्या लागत आहे. याच भोंगळ कारभाराविषयी डीवायएफआय संघटनेतर्फे (DYFI organization) युवकांनी रस्त्यावर उतरून आंदोलन (Movement) छेडले.

- Advertisement -

सुरगाणा तालुक्यातील (Surgana Taluka) आदिवासी, शेतकरी (Farmers), युवक, विद्यार्थी (Students), व्यावसायिक यांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत होते. तालुक्यात (देना बँक) बँक ऑफ बडोदा या सर्वात जुन्या बँक शाखेमध्ये साधारण एक लाखाहून अधिक खातेदार आहे. त्या खातेदारांमध्ये शिष्यवृत्ती घेणारे सर्व विद्यार्थी, वेतन घेणारे सर्व सरकारी नोकर वर्ग, शेतकरी, व्यापारी, वृध्दपकाळ पेन्शन घेणारे, बचत गट यांच्या खात्यांचा समावेश आहे.

पुर्वी देना बँक होती आता त्या बँकेचे वर्गीकरण बँक ऑफ बडोदा मध्ये झाल्यामुळे साधारण एक वर्षापासून शे दोनशे खातेदार सोडले तर उर्वरित एक लाख खातेदारांना अद्याप पर्यंत बँक पासबुक मिळाले नाही. पासबुक अभावी आज सर्व खातेदारांना खूप अडचणीला सामोरे जावे लागत आहे. त्यामध्ये सरकरी नोकर वर्गाला त्यांचा पगार खात्यामध्ये वर्ग करण्यासाठी बँक पासबुक (Bank passbook) च्या पहिल्या पानाची झेरॉक्स लागते.

विद्यार्थ्यांना त्यांच्या शिष्यवृत्तीसाठी बँक पासबुक आवश्यक आहे. शेतकरी, व्यापारी यांचे दैनंदिन व्यवहार याच बँकमधुन पासबुक अभावी सुरू आहेत.तसेच महिला बचत गट आणि वृध्दपकाळ पेन्शन (Pension) योजनेचा लाभ घेणारे सर्व लाभार्थी याच बँकेचे खातेदार आहे. गेल्या एक महिन्यांपुर्वी खातेदार लोक रात्री बँकेच्या दारात क्रमांक लावूण तेथेच भर पावसात झोपत होती.

म्हणुन सर्व खातेदारांची गेल्या एक वर्षापासून सुरू असलेली पिळवणूक थांबवून संबंधित सर्व खातेदारांना एक महिन्याच्या आत बँक पासबुक वर फोटो लावून त्याच्यावर बँक मॅनेजर यांची सही शिक्का मारुन ते पासबुक खातेदारांना विनाविलंब वितरीत करण्यात यावे यासाठी युवा क्रांतिकारी संघटनेच्या वतीने बँक ऑफ बडोदा येथे आंदोलन छेडण्यात आले. यावेळी विविध समस्यांचे निवेदन बँकेचे शाखाधिकार्‍यांना सादर करण्यात आले.

यावेळी पोलिस उपनिरीक्षक दिलीप पवार उपस्थित होते. शाखाधिकार्‍यांनी लेखी आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. यावेळी पांडुरंग गायकवाड, सुभाष भोये, अशोक धुम, चंद्रकांत वाघेरे, कान्हा हिरे, शिवराम गावित, राहुल आहेर, देविदास हाडळ, नितीन गावित, मेनका पवार, रोहिणी वाघेरे, सविता गायकवाड, भारती चौधरी, नितीन पवार, सुनिल जाधव, संतु पालवा,

वसंत झिरवाळ, गुलाब खांडवी, गिरीष गायकवाड, मधुकर म्हसे, दानिएल गांगुर्डे, जगन गावीत, राहुल गावीत, लिलाधर चौधरी, अशोक भोये, हेमंत भुसारे, योगेश थोरात, संस्कार पगारीया, धर्मेंद्र पगारीया, सुरेश गवळी, राजु शेख, वसंत बागुल, चिंतामण गवळी, भास्कर जाधव, योगेश महाले, पांडुरंग गावीत, मोहन पवार, कृष्णा भोये आदींसह कार्यकर्ते, पदाधिकारी, खातेदार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या