Friday, April 26, 2024
Homeधुळेहिरे महाविद्यालयात दाखल केलेल्या आईचा मृत्यू, मुलगा बेपत्ता

हिरे महाविद्यालयात दाखल केलेल्या आईचा मृत्यू, मुलगा बेपत्ता

धुळे – Dhule – प्रतिनिधी :

शहरातील चक्करबर्डी परिसरातील श्री हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात आईला दाखल करून मुलगा गायब झाला.

- Advertisement -

त्याने स्वत:चा पत्ताही चुकीचा दिला. दरम्यान उपचारादरम्यान महिलेचा मृत्यू झाला असून पोलिसांनी तिच्या मुलासह नातेवाईकांचा शोध सुरू केला आहे.

हिरे वैद्यकीय महाविद्यालयात दि. 23 एप्रिल रोजी दुपारी रूख्मिणीबाई आत्माराम पाटील (वय 82, रा. प्रोफेसर कॉलनी, देवपूर) या महिलेला तिचा मुलगा प्रदीप याने उपचारार्थ दाखल केले.

उपचारादरम्यान दि. 24 रोजी दुपारी महिलेचा न्युमोनिया आजाराने मृत्यू झाला. तिला दाखल करणारा मुलगा प्रदीप व इतर कोणीही तिची विचारपूस करण्यासाठी आले नाही.

त्यामुळे रूग्णालयाने शहर पोलिसांना माहिती दिली. त्यानुसार पोलिसांनी मुलाने दिलेल्या पत्यावर चौकशी केली.

मात्र, तेथे मयत महिला राहत नसल्याचे समोर आले. महिलेचा मृतदेह जिल्हा रूग्णालयातील शवागारात ठेवण्यात आला आहे. महिलेला कोणी ओळखत असल्यास शहर पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या