Thursday, April 25, 2024
Homeदेश विदेशअमेरिकेत करोनाचे सर्वाधिक रुग्ण

अमेरिकेत करोनाचे सर्वाधिक रुग्ण

वॉशिंग्टन – जागतिक महासत्ता असणारी अमेरिका करोनाचा संसर्गाचे नवे केंद्र बनले आहे. जगातील सर्वाधिक करोनाबाधित रुग्ण सध्या अमेरिकेत असून चीन, इटलीलाही मागे टाकले आहे. करोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी उपाययोजना आखण्यात आल्यानंतरही अमेरिकेत करोनाचा फैलाव मोठ्या प्रमाणावर झाला आहे.

गुरुवारी एकाच दिवसात अमेरिकेत 17 हजार करोनाबाधित रुग्ण आढळले. अमेरिकेत आतापर्यंत 83 हजार 500 करोनाबाधित आढळले आहेत. तर, चीनमध्ये 81 हजार 782 आणि इटलीत 80 हजार 589 इतके करोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. अमेरिकेत करोनामुळे 1300 जणांचा मृत्यू झाला आहे. तर चीनमध्ये 3292 आणि इटलीत सर्वाधिक 8215 जणांचा मृत्यू झाला आहे.

- Advertisement -

अमेरिकेत मागील आठवड्यात 8 हजार करोनाचे रुग्ण आढळले होते. तर, या आठवड्यात बाधितांची संख्या 85 हजार झाली आहे. एकाच आठवड्यात करोनाबाधितांची संख्या 10 पटीने ीन्यूयॉर्कमध्ये करोनाचा संसर्ग सर्वाधिक झाला आहे. न्यूयॉर्कमध्ये तब्बल 38 हजार 977 जणांना करोनाची बाधा झाली आहे. तर, 466 जणांचा मृत्यू झाला आहे. न्यूयॉर्कमधील आरोग्य व्यवस्था कोलमडून पडली असल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे.

आवश्यकतेनुसार रुग्णांवर उपचार करण्यासाठी वैद्यकीय कर्मचारी, रुग्ण खाटा उपलब्ध नाहीत. न्यूयॉर्कचे गर्व्हनर अ‍ॅण्ड्र्यू काओमो यांनी सांगितले की, निवृत्त झालेल्या आरोग्य कर्मचार्‍यांना पुन्हा सेवेत रुजू होण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्याशिवाय न्यूयॉर्कमध्ये 30 हजार स्वयंसेवकांची आवश्यकता आहे. मात्र, प्रत्यक्षात 400 स्वयंसेवक कार्यरत आहेत. एवढे स्वयंसेवक तरी किती काम करतील? अशी खंत त्यांनी व्यक्त केली. न्यूजर्सीमध्ये 6 हजार 876, कॅलिफोर्नियात 4 हजार 44 जणांना करोनाची बाधा झाली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या