जानोरी | Janori
करोनाच्या पार्श्वभूमीवर बंद झालेली नाशिक-मोहाडी शहर बस सेवा सुरू झाल्याने प्रवाशांमध्ये समाधान व्यक्त होत आहे.
दरम्यान माजी जि. प. गटनेते प्रवीण जाधव यांच्या प्रयत्नातून बस सेवा पुन्हा सुरू झाल्याने परिसरातील नागरिकांनी आभार मानले आहे.
नाशिक येथील वाहतूक व्यवस्था विभाग नियंत्रक नितीन मैंद यांना निवेदन देऊन जानोरी व मोहाडी ग्रामस्थांच्या वतीने ही शहर बस सेवा चालू करावी यासाठी मागणी केली होती. ती मागणी लक्षात घेऊन संबंधित अधिकाऱ्यांनी शहर बस सेवा सुरू करण्यात आली आहे.
यावेळी वाहक व चालक या दोघांचाही परिसरातील नागरिकांच्यावतीने सत्कार करण्यात आला.