Friday, April 26, 2024
Homeनाशिकशेतकर्‍यांना आधुनिक शेती विषयक मार्गदर्शन

शेतकर्‍यांना आधुनिक शेती विषयक मार्गदर्शन

ठाणगाव । वार्ताहर Thangaon

सुरगाणा तालुक्यातील ( Surgana Taluka ) बार्‍हे परिसरातील ( Barhe Area )शेतकर्‍यांना सुरगाणा मंडल अधिकारी एस. बागुल यांच्या मार्गदर्शनाखाली सुरगाणा उत्पादक कंपनी व कृषी विभाग ( Department of Agriculture ) यांच्या संयुक्त विद्यमाने केळावण येथे शेतकर्‍यांच्या शेतात जाऊन आधुनिक शेतीचे धडे दिले.

- Advertisement -

कृषीच्या विविध योजना (महा डिबीटी), आनलाईन अर्ज करणे, मिरची, दोडके लागवड, शेती विषयक नवनवीन प्रयोग, रासायनिक खते तसेच पाण्याच्या अति वापरामुळे होणारा दुष्परिणाम, माती पाणी परीक्षण, पिकावरील किड रोगाचे नियंत्रण, औषधाचा वापर, शेतमालाची खरेदी-विक्री, मोबाईल अ‍ॅपद्वारे मिळणारी कृषीविषयक माहिती मंडल अधिकारी एस. बागुल, कृषी सहाय्यक उत्तम जगताप, भदाणे, चौरे यांनी शेतकर्‍यांना दिली..

सेंद्रीय शेती, जमिनीची सुपिकता, पिकांवरील रोगराई, शेणखत, गांडूळ खत, कोंबड खत, लेंडी खत, कंपनीचे ध्येय धोरणे, उद्दिष्टे तसेच सर्व शेतकर्‍यांनी एकत्र येऊन आपल्या मालावर प्रक्रिया करून कसा विकता येईल, अशा विविध विषयांवर सखोल मार्गदर्शन सुरगाणा उत्पादक कंपनीचे अध्यक्ष केशव पालवी, सचिव जयप्रकाश महाले यांनी शेतकर्‍यांना केले.

यावेळी कंपनीचे संचालक संजय पडेर, दिलीप दळवी, विलास जाधव, मोहन गावीत, कैलास भोंडवे, विलास चौधरी, पोलीस पाटील विजय चौधरी, चंदर चौधरी, गणेश चौधरी, कंपनीचे संचालक भास्कर बेंडकोळी आदींसह तसेच शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या