Friday, April 26, 2024
Homeनंदुरबारप्रांताधिकार्‍यांच्या कारवाईने दांडीबहाद्दर कर्मचारी धास्तावले

प्रांताधिकार्‍यांच्या कारवाईने दांडीबहाद्दर कर्मचारी धास्तावले

सोमावल/मोदलपाडा – Modalpada – वार्ताहर :

अखेर सहाय्यक जिल्हाधिकारी अविशांत पांडा यांनी शासकीय कार्यालयांना अचानक भेटी देत दांडीबहाद्दर कर्मचार्‍यांवर कार्यवाहीचे संकेत दिल्याने दांडीबहाद्दर कर्मचारी खूपच धास्तावले आहेत.

- Advertisement -

पंचायत समितीच्या बांधकाम विभागातील शाखा अभियंते नियमित दांडी मारतात कोणी विचारलेच तर नेहमीच साईटवर व जिल्हा मुख्यालयी मिटिंग गेले आहेत, असे त्यांच्या पाठीराख्यांकडून सांगण्यात येते, अश्या आशयाची बातमी दै देशदूतमध्ये 3 फेब्रुवारी 2021 रोजी प्रकाशित करण्यात आली होती.

त्याची दखल घेत सहाय्यक जिल्हाधिकारी अविशांत पांडा यांनी शासकीय कार्यालयांना अचानक भेटी देवून झाडाझडती घेतली. यात तब्बल 25 कर्मचारी गायब असल्याचे निदर्शनास आले आहे .

देशदूत वृत्ताची दखल घेवून ही कारवाई करण्यात आली आहे. सहाय्यक जिल्हाधिकार्‍यांनी केलेल्या कार्यवाहीचे कौतुक सर्वसामन्यात होत असतांना नेहमी विभागप्रमुख आपल्या कर्मचार्‍यांना वाचविण्यात यशस्वी होतात. किमान यावेळी कर्मचार्‍यांना अद्दल घडविण्याची इच्छाशक्ती विभाग प्रमुख अधिकार्‍यांची होणे आवश्यक आहे.

श्री.पांडा यांच्याकडुन सखोल चौकशी होवून खरंच संबंधीत गैरहजर कर्मचारी साईटवर व मिटिंगला गेले होते काय? याबाबत येत्या काळात खुलासा होईलच परंतु अश्या कर्मचार्‍यांवर वचक बसण्यासाठी दोषींवर कार्यवाहीची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.

गैरहजर आढळून आलेले कर्मचारी चौकशी होण्याआधी सावरासावर करण्याचा प्रयत्न करतील यावर ठोस पावले उचलण्याची गरज निर्माण झाली आहे.

आपल्याच विभागातील विभागप्रमुख आपणास सांभाळून घेतात, सर्वकाही मॅनेज होते एखादा कर्मचार्‍यांवर कार्यवाहिला सामोरे जाण्याची वेळ आली तर त्याला सांभाळून घेण्यासाठी वरिष्ठ अधिकार्‍यापासून ते शिपायापावेतो सर्वच जण सरसावतात, या मानसिकतेला टाच देण्याची हीच वेळ आहे.

दांडीबहाद्दर कर्मचार्‍यांना कडक कार्यवाहिला सामोरे जावे लागते अशी कर्मचार्‍यांमध्ये भिती वाटणे निदान हे प्रकरण उत्तम उदाहरण बनण्याची अपेक्षा आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या