महसूल व ऊर्जामंत्रिपदी थोरात यांची निवडीने संगमनेरात जल्लोष

संगमनेर (प्रतिनिधी) – महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष व कॅबिनेट बाळासाहेब थोरात यांना महाविकास आघाडीच्या मंत्रिमंडळात महसूल, ऊर्जा व शालेय शिक्षण खात्याची जबाबदारी मिळाल्याने संगमनेरातील कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतषबाजी करून एकच जल्लोष केला.
नामदार बाळासाहेब थोरात यांनी यापूर्वी महसूल खात्याची जबाबदारी सक्षमपणे सांभाळताना या खात्याला लोकाभिमुख व गतिमान केले होते.

महसूल विभाग हायटेक बनविताना ऑनलाईन सातबारा सह पारदर्शी व चांगल्या कामातून या विभागाची लिमका बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद केली होती. याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेब थोरात यांच्याकडे महत्वाच्या महसूल खात्याची जबाबदारी दिली आहे. याचबरोबर ऊर्जा व शालेय शिक्षण, पशुवैद्यकीय या खात्यांच्या भार ना. बाळासाहेब थोरात यांच्याकडे असणार आहेत.

काँग्रेसच्या अडचणीच्या काळामध्ये पक्षाला ऊर्जितावस्था देणार्‍या ना. थोरात यांनी कायम महाराष्ट्रातील गोरगरिबांच्या विकासाचा विचार केला आहे. यामुळे महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात शेतकर्‍यांचे नेते म्हणून त्यांचा त्यांच्याकडे सर्वजण मोठ्या आशेने पाहत आहेत. ना. बाळासाहेब थोरात यांच्याकडे महसूल हे महत्वाचे खाते राहील असा अमहदनगर जिल्ह्यासह सर्वांना मोठा विश्वास होता.

अनेक दिवस लांबलेल्या मंत्रिमंडळाच्या खातेवाटपावर शिक्कामोर्तब होताच संगमनेरात सर्वत्र एकच जल्लोष करण्यात आला. अमृतनगर, यशोधन कार्यालय, ना. थोरात यांचे निवासस्थान, तसेच नवीन नगर रोड, सय्यद बाबा चौक अशा विविध ठिकाणी कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतषबाजी केली तर गावोगावी ही गुलालाची उधळण झाली.

यावेळी इंद्रजीत भाऊ थोरात, तालुका काँग्रेस अध्यक्ष बाबा ओहळ, युवक काँग्रेसचे अध्यक्ष आनंदा वर्पे, उपाध्यक्ष सुभाष सांगळे, भास्कर पानसरे, नामदेव कहांडळ, मच्छिंद्र गुंजाळ, विशाल काळे, अभिजीत बेंद्रे, महेश वाव्हळ, जालिंदर धोक्रट, तात्यासाहेब कुटे, दत्तू कोकणे, समीर कडलग, अजित सरोदे, लक्ष्मण गोर्डे, बाळासाहेब हांडे आदींसह तालुक्यातील पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *