Friday, April 26, 2024
Homeमुख्य बातम्याअंगात कोपरी, डोक्यावर मुंडासे घालून जेव्हा विधानसभा उपाध्यक्ष अवतरतात...

अंगात कोपरी, डोक्यावर मुंडासे घालून जेव्हा विधानसभा उपाध्यक्ष अवतरतात…

ओझे |विलास ढाकणे

विधानसभेचे उपाध्यक्ष आणि दिंडोरी पेठ विधानसभेचे आमदार नरहरी झिरवाळ हे आपल्या मिश्किल स्वभावाने जसे परिचित आहेत. तसेच ते साध्या व पारंपारिक राहणीमानामुळेही नेहमीच चर्चेत असतात.

- Advertisement -

करोनाची बाधा झाल्यानंतर त्यावर यशस्वीपणे मात करून पुन्हा जनसेवेत दाखल झालेल्या आमदार झिरवाळ यांनी मतदारसंघातील एका छोटेखानी सभेला संबोधित करताना चक्क कंबरेला धोतर, अंगात कोपरी, व डोक्यावर मुंडासे असा वेश परिधान करत लक्ष वेधून घेतले.

विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी नुकतीच पेठ तालुक्यातील माळेगाव येथील जोगविहीर मंदिरात नागरिकांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी केलेला शेतक-याचा पारंपारिक पेहराव पाहून उपस्थित शेतकरी व ग्रामस्थही अचंबित झाले.

यावेळी झिरवाळ यांनी पाणी, रस्ते ,वीज, औद्योगिक वसाहत, यासह अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या खरीप पिकांच्या नुकसानीचा आढावा घेतला.

करोना काळात नागरिकांनी मास्क परिधान करणे, हात धुणे ,सुरक्षित आंतर ठेवण्याचे आवाहन ही त्यांनी उपस्थितांना केले.

याप्रसंगी माजी जि.प.सदस्य भिकाजी चौधरी, राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष दामु राऊत, राष्ट्रवादी युवक अध्यक्ष गिरीश गावित, माजी सभापती मनोहर चौधरी, महिलाध्यक्ष पुनम गवळी, नामदेव मोहंडकर पुंडलिक सातपुते, रामदास गवळी, यांच्या सह नागरिक उपस्थित होते.

विधानसभेच्या ‘त्या’ भाषणाची मात्र चर्चा

आमदार झिरवाळ यांची विधानसभेचे उपाध्यक्ष पदी निवड झाल्यानंतर त्यांनी आपल्या खास ग्रामीण भाषेत केलेले भाषण सभागृहात गाजले. याची यावेळी उपस्थितांना आठवण झाली. यावेळी ते म्हणाले की, जसा परमार्थ करतांना पथ्य पाळावी लागतात. तसे राजकारण करतांना दिलेले शब्द पाळावे लागतात.

- Advertisment -

ताज्या बातम्या